Header Ads

Faceless service of RTO launched - आरटीओची फेसलेस सेवा सुरु

Faceless service of RTO launched - आरटीओची फेसलेस सेवा सुरु


आरटीओची फेसलेस सेवा सुरु

Faceless service of RTO launched

       वाशिम, दि. 17 (जिमाका) www.jantaparishad.com : परिवहन विभागामार्फत नागरीकांच्या सोयीसाठी सारथी व वाहन प्रणालीवर कामे करण्याच्यादृष्टीने व वेळेची बचत होण्याच्यासाठी फेसलेस सेवा सुरु (Faceless service of RTO launched) करण्यात आल्या आहे. उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत अनुज्ञप्ती संबंधित सारथी प्रणालीमार्फत एकूण 13 सेवा फेसलेस स्वरुपात सुरु करण्यात आल्या आहे. संबंधितांनी www.parivahan.gov.in या संकेतस्थळाला भेट देवून सेवांचा लाभ घ्यावा. 

        वाहना संबंधित (vehicle related) असलेली कामे सुरळीत व्हावीत यादृष्टीने वाहन प्रणालीमार्फत एकूण 7 सेवा व परवाना संबंधित 8 सेवा फेसलेस स्वरुपात सुरु करण्यात आल्या आहे. या सेवांचा लाभ घेण्यासाठी वरील संकेतस्थळाचा वापर करावा. असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी ज्ञानेश्वर हिरडे यांनी केले आहे.

No comments

Powered by Blogger.