Header Ads

वाशिम येथे ३ मे रोजी पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा Pandit Dindayal Upadhyay Job Fair at Washim on 3rd may

वाशिम येथे ३ मे रोजी पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा Pandit Dindayal Upadhyay Job Fair on 3rd may at Washim


वाशिम येथे ३ मे रोजी पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा

विविध प्रकारच्या पदनामांकरीता ७० पेक्षा जास्त रिक्तिपदावर रोजगार मिळवण्याची संधी 

            वाशिम,दि.२८ (जिमाका) www.jantaparishad.com - कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत नोकरी ईच्छ्क युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याच्या दुष्टीने पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्या (Pandit Dindayal Upadhyay Job Fair) चे आयोजन करण्यात येते. रोजगार इच्छ्क उमेदवारांना विविध क्षेत्रांत निर्माण होत असलेल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने जिल्हयात जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, वाशिमच्या वतीने ३ मे रोजी जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, तळमजला, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर,वाशिम येथे रोजगार मेळावा आयोजित केला आहे.

         मेळाव्यात राज्यातील नामांकीत उद्योजक प्रतिनिधी उपस्थित राहन मुलाखताद्वार नोकरी इच्छूक उमेदवाराना रोजगार देण्यासाठी सहभागी होत आहे.ज्या रोजगार ईच्छ्क उमेदवारांचे किमान १० वी, १२ वी, आय.टी.आय. (इलेक्टॉनिक्स ट्रेड),पदवीधर (कला वाणिज्य विज्ञान इंजिनिअरिंग) शैक्षणीक पात्रता असून १८ ते ४५ वयोगटातील आहेत.अशा युवक-युवती उमेदवारांच्या मुलाखती घेऊन विविध प्रकारच्या पदनामांकरीता ७० पेक्षा जास्त रिक्तिपदावर रोजगार मिळवण्याची संधी जिल्हयातील नोकरी इच्छ्क उमेदवारांना याव्दारे प्राप्त होणार आहे.

          वाशिम जिल्हयातील रोजगार इच्छुक www.mahaswayam.gov.in आणि www.nic.gov.in या वेवपोर्टलवर ऑनलाईन पध्दतीने विविध पदासाठी शैक्षणिक पात्रतेनुसार ऑनलाईन पध्दतीने सहभागी होवून ३ मे २०२३ रोजी कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तळमजला,जिल्हाधिकारी कार्यालय परिसर वाशिम जि. वाशिम येथे उपस्थित राहावे,असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त सुनंदा बजाज यांनी केले आहे.

          रोजगार इच्छुक उमेदवारांनी स्व-खर्चाने त्यांचे २ पासपोर्ट आकाराच्या फोटोसह आधार कार्ड व शैक्षणिक पात्रतेच्या झेरॉक्स प्रतीसह प्रत्यक्षपणे उपस्थित राहावे.अधिक माहितीकरीता दुरध्वनी क्र. ०७२५२-२३१४९४ तसेच भ्रमणध्वनी क्र. ७७७५८१४९५३, ९८५०९८३३३५ व ९७६४७९४०३७ यावर संपर्क करावा.

No comments

Powered by Blogger.