Header Ads

श्री. चंद्रनाथस्वामी काष्टासंघ दिगंबर जैन मंदिरात श्री पद्मावती मातेचा वार्षिक रथोत्सव - padmavati mata varshik rath utsav karanja lad

श्री. चंद्रनाथस्वामी काष्टासंघ दिगंबर जैन मंदिरात  श्री पद्मावती मातेचा वार्षिक रथोत्सव - padmavati mata varshik rath utsav karanja lad


श्री. चंद्रनाथस्वामी काष्टासंघ दिगंबर जैन मंदिरात 
श्री पद्मावती मातेचा वार्षिक रथोत्सव

        कारंजा  दि. 8 - जैनांची काशी म्हणून संबोधण्यात येते. शहरात दिगंबर जैन समाजाची अत्यंत प्राचीन ३ मंदिरे आहेत. या पैकी सर्वात प्राचीन मंदिर म्हणजे श्री १००८ चंद्रनाथ स्वामी काष्टासंघ दिगंबर जैन मंदिर (Shri 1008 Chandranath Swami Kashtasangh Digambar Jain Mandir Karanja) होय. मंदिरामधे असणाऱ्या प्रतिमांवरील लेखाचे वाचन केले असता, प्राचीनत्व सिद्ध होते. 

    या मंदिरामध्ये प्राचीन काळापासून चालत आलेल्या प्रथा, परंपरांचे जतन करण्याचा प्रयत्न येथील ट्रस्टी व  समस्त पंचमंडळीकडून केले जाते. सदर मंदिराचे मुलनायक श्री १००८ चंद्रनाथ स्वामी यांची प्रतिमा आहे. पांढ-या संगमरवरी पाषाणातील सदर प्रतिमा प्रत्येक भाविकाचे मन मोहून घेते. याच मंदिरात श्री प‌द्मावतीमातेचे स्थान असून सदर स्थान हे जैन परंपरेतील अतिशय महत्वाचे मानले जाते. हुम्मस पद्मावती कणार्टक, कारंजा लाड व अंजनगाव पद्मावती असे तीन स्थान मातेचे मानले जातात. याच मातांचा भव्योत्सव चैत्र महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो, म्हनजेज 8 एप्रिल ला  उत्सव मंदिरात साजरा केला जातो. प्रत्येक वर्षी पौर्णिमेला मातेच्या प्रतिमेचे पुजन केले जाते, या पुजेकरीता गावोगावातून भाविक मंडळी नगरीत दाखल होतात. सदर पुजनाचा प्रथम मान श्री नगरनाईक परिवारास परंपरेने प्राप्त झालेला आहे. त्याकरीता नगरनाईक परिवाराचे सदस्य येथे येतात; ही महापुजा रात्री ९वाजता  सुरु होऊन उत्तररात्री समाप्त होते.

        दि. 8 एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजतापासून मातेची ओटी भरण्याचा कार्यक्रम सूरु प्रारभ होऊन रात्री ८ वाजता श्री पद्मावती मातेचा वार्षिक रथोत्सवास ( padmavati mata varshik rath utsav) सुरुवात होते. हा रथोत्सव साजरा करण्यास गावोगावाहून भजनी मंडळे रात्रभर भजणे म्हणत साथ देण्यास उपस्थित होतात. या रथोत्सवाकरीता मातेचा दोन मजली प्राचीन रथ अत्यंत आकर्षक पद्धतीने सजवला जातो. त्याच समवेत मातेची प्रतिमा पालखीत विराजमान केली जाते. या रथोत्सवास सुरुवात होते. यात लेझीम, भजने, फुगडी इत्यादीच्या तालावर संपूर्ण गावातून रात्रभर भ्रमण करीत रथोत्सव सकाळी परत मंदिरात येतो. यानंतर मंदिरात अरुणकुमार नांदगावकर यांचे परीवारातर्फे प्रसाद वाटप होतो व कार्यक्रमाचे समापन होते.या कार्यक्रमास मंदिराचे अध्यक्ष अतुल नांदगावकर सचिव, अनिल संगई कस्तुरीवाले, सदस्य  हेमंत मिश्रीकोटकर, सन्मती दर्यापूरकर, निशांत कस्तुरीवाले यांचे नेतृत्वात रथोत्सव समीती अध्यक्ष विपूल दर्यापूरकर,सुदर्शन दर्यापूरकर, तेजस नांदगावकर, शशीकांत नांदगावकर, प्रांजल दर्यापूरकर, अविन नांदगावकर, अनुप नांदगावकर, सर्वेश दर्यापूरकर, नितिश कस्तुरीवाले यांचे सहकार्याने पार पडतो. सदर रथोत्सवास संपूर्ण कारंजा (लाड) नगरीच्या जैन समाजाचे उत्फूर्त सहभाग असतो.

No comments

Powered by Blogger.