Header Ads

असंघटित कामगारांनी ई-श्रम पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करावी : कामगार विभागाचे आवाहन - e shram card portal Online Resigstration appeal to unorganized workers



असंघटित कामगारांनी ई-श्रम पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करावी 

कामगार विभागाचे आवाहन

       वाशिम, दि. २८ (जिमाका + www.jantaparishad.com) : असंघटित कामगारांची नोंदणी करण्याकरीता ई-श्रम पोर्टल (e shram card portal) सुरू करण्यात आले आहे. या राष्ट्रीय डेटाबेसच्या आधारावर असंघटित कामगाराकरीता सामाजिक सुरक्षा योजना अंमलात आणल्या जाणार आहे. नोंदणीकृत कामगाराचा प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजने चा एक वर्षाचा वार्षिक हप्ता १२ रुपये केंद्र शासन भरणार आहे.

          ई -श्रम पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी (e shram card portal Online Resigstration) करण्यासाठी असंघटीत कामगाराचे वय १६ ते ५९ वर्षादरम्यान असावे.तो आयकर भरणारा नसावा.इपीएफओ आणि इसीआयसीचा सदस्य नसावा. आधारकार्ड व बँक पासबुक आदी कागदपत्रे आवश्यक आहे. जिल्हयात ३० डिसेंबर पर्यंत एकुण १ लक्ष ७२ हजार ७०४ कामगारांनी ई-श्रम पोर्टलवर नोंदणी केली आहे. 

    अधिक माहितीसाठी जवळच्या नागरी सुविधा केंद्र (CSC) अथवा ई -श्रम पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी (e shram card portal Online Resigstration) www.eshram.gov.in या संकेतस्थळाला भेट दयावी. नॅशनल हेल्पलाईन १४४३४, टोल फ्री १८०० १३७४ १५० (National Help Line 14434 Toll Free Number 1800 1374 150) या क्रमांकावर नोंदणी करावी असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी,वाशिम यांनी केले आहे.

No comments

Powered by Blogger.