Header Ads

कारंजा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक २०२३ - APMC Karanja lad Election 2023 Voting on 30 April

कारंजा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक २०२३ - APMC Karanja lad Election 2023 Voting on 30 April


कारंजा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक २०२३ 

३० एप्रिल रोजी मतदान व मतमोजणी 

विविध मतदार संघासाठी मतदान केंद्र अंतर्गत गांव व मतदार संख्या पुढील प्रमाणे 

 APMC Karanja lad Election 2023 Voting on 30 April

कारंजा (www.jantaparishad.com) दि.28 - कृषी उत्पन्न बाजार समिती कारंजाच्या संचालक मंडळाच्या सन २०२३-२८ या कालावधीच्या निवडणुकीकरिता मतदान ३० एप्रिल रोजी ( APMC Karanja lad Election 2023 Voting on 30 April) सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत होणार असून मतमोजणी त्याच दिवशी दुपारी ४ वाजतानंतर मतदान संपल्यानंतर मंगरुळपीर मार्गावरील बाजार समिती, शेतकरी निवास येथे होणार आहे.

       १८ जागांसाठी ७० उमेदवार निवडणूक रिंगणात असून निवडणूक बहुरंगी होणार असल्याचे चिन्ह आहे. यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातील ११ जागांसाठी ४४ उमेदवार असून एकुण ७९५ मतदार आहेत. ग्राम पंचायत मतदार संघात ४ जागांसाठी १८ उमेदवार उभे असून ७५६ मतदार त्यांचे भविष्य ठरविणार आहे. अडते व व्यापारी मतदार संघाच्या २ जागा असून ६ उमेदवार तर हमाल मापारी मतदार संघाच्या १ जागेसाठी २ उमेदवार निवडणूक लढवित आहेत. 

स्थानिक स्वराज्य संस्था व  ग्राम पंचायत मतदार संघासाठी
मतदान केंद्र अंतर्गत गांव मतदार संख्या पुढील प्रमाणे 

मूलजी जेठा नगर परिषद उर्दू हायस्कूल, मंगरूळ वेस, दारव्हा रोड, कारंजा येथे मतदान केंद्र आहे. या केंद्रात १९२ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. यामध्ये विविध कार्यकारी सोसायटी संस्था कारंजा, भडशिवनी, दादगाव, धामणी, गायवळ, गिर्डा, कामठवाडा, काकडशिवणी, काळी, पसरणी, पिंपरी (बारहाट), पिंपळगाव, सोहळ, शहा व शेलुवाडा येथील एकूण १९२ मतदार

      जि.प. शाळा पोहा येथील मतदान केंद्रात पोहा, बेलमंडळ, किनखेड, लोहगाव, लोहारा, महागाव,  मुरंबी, पारवा, शेवती, वळवी व वाई येथील १४० मतदार मतदान करतील.

जिल्हा परिषद हायस्कूल कामरगाव येथील मतदान केंद्रावर १६६ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. यामध्ये कामरगाव, बांबर्डा, बेंबळा, बेलखेड, भुलोडा,  जामठी, जानोरी, काजळेश्वर, खेर्डा(बु), लाडेगाव, पलाना, टाकळी शिवण(बु), येथील मतदारांचा समावेश आहे.

जिल्हा परिषद केंद्र शाळा धनज (बु) येथील मतदान केंद्रावर धनज(बु), भामदेवी, डोंगरगाव, धनज(खु), हिंगणवाडी, हिवरा(लाहे), लोणी(अरब), माळेगाव, मेहा, पिंपरी (मोडक), राहटी येथील १४३ मतदार मतदान करतील.

उंबर्डाबाजार येथील जिल्हा परिषद हायस्कूल येथील मतदान केंद्रावर उंबर्डा बाजार, दुघोरा, दोनद(बु), धानोरा(ताथोड), इंझा, खेर्डा(कारंजा), पिंपरी(वरघट), सुकळी, वडगाव (रंगे), यावर्डी, येवता व मनभा येथील १५४ मतदार मतदान करतील.

मूलजी जेठा नगर परिषद उर्दू हायस्कूल मंगरूळपीर वेस, दारव्हा रोड कारंजा येथे आखातवाडा, धामणी (खडी), भडशिवनी, गायवळ, गिर्डा, जयपूर, जाबं, काकडशिवनी,  कामठवाडा, कोळी, किन्ही (रोकडे),  मोखड(पिंपरी), पसरणी, शहा, सोहळ, वडगाव(इजारा), वाघोळा, वालई, पिंपळगाव(खुर्द), दादगाव व रामनगर येथील १७३ मतदार 

जिल्हा परिषद शाळा पोहा येथील मतदान केंद्रावर बेलमंडळ, किनखेड, लोहारा, लोहगाव, महागाव, मुरंबी, परावा(कोहर), पोहा, शेलुवाडा, शेवती, शिवनगर, तुळजापूर, वढवी वाई येथील १२२ मतदार 

जिल्हा परिषद हायस्कूल कामरगाव येथील मतदान केंद्रावर अंतरखेड, बांबर्डा,बेलखेड,बेंबळा,जानोरी, कामरगाव, कामठा, खेर्डा(बु), काजळेश्वर, लाडेगाव, म्हसला, पलाना पिंपळगाव(बु), शिवण(बु), टाकळी (खुर्द), विळेगाव, बापटी व खानापूर येथील १६९ मतदार मतदान करतील.

        जिल्हा परिषद केंद्र शाळा धनज(बु) या मतदान केंद्रावर भामदेवी, भिवरी, ढंगारखेड, धनज(खु),धोत्रा (जहागीर), डोंगरगाव, हिंगणवाडी, हिवरा(लाहे), लोणी (अरब), माळेगाव, मेहा, मोहगव्हाण, निंबा(जहा), राहटी, सिरसोली, तारखेडा, वीरगव्हाण, झोडगा व पिंपरी (मोडक) येथील १६५ मतदार 

उंबर्डाबाजार जिल्हा परिषद हायस्कूल मतदान केंद्रावर धानोरा (ताथोड), दिघी,दोनद(बु), दुधोरा, इंझा, कार्ली,  खेर्डा(कारंजा), मनभा, पिंपरी(वरघट), सोमठाणा, सुकळी, उंबर्डा बाजार, वडगाव(रंगे), यावर्डी व येवता येथील १२७ मतदार मतदान करतील.

व्यापारी व अडते तसेच हमाल व मापारी मतदार संघ

मुलजी जेठा नगर परिषद उर्दू हायस्कूल, मंगरूळ वेस, दारव्हा रोड, कारंजा येथील मतदान केंद्रावर व्यापारी व अडते असे ४६७ मतदार व त्याच केंद्रावर हमाल व मापारी असे ३०२ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील.

No comments

Powered by Blogger.