Header Ads

आधार कार्डला १० वर्ष झाली असेल तर अपडेट करा - update aadhar card registered 10 years ago

आधार कार्डला १० वर्ष झाली असेल तर अपडेट करा - update aadhar card registered 10 years ago


आधार कार्डला १० वर्ष झाली असेल तर अपडेट करा

जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

       वाशिम, दि. 05 (जिमाका) : देशातील प्रत्येक नागरीकाला केंद्र शासनाकडून विशिष्ट सांकेतीक क्रमांक असलेले आधार कार्ड देण्यात येते. प्रत्येक नागरीकाकडे शासकीय कामाकरीता आधार कार्ड असणे आवश्यक आहे. केंद्र शासनाकडून दिले जाणारे हे आधार कार्ड प्रत्येक 10 वर्षानंतर अपडेट करण्याचे निर्देश आहे. त्यामुळे बनावट आधारकार्डव्दारे फसवणूक होणार नाही तसेच नागरीकांची माहिती ही सुरक्षित राहील. जिल्हयातील ज्या नागरीकांना आधार नोंदणी करुन 10 वर्ष झालेले असेल त्यांनी आपले आधारकार्ड अपडेट करुन घ्यावे. असे आवाहन जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी केले आहे.

          शासकीय बँक सेवेसाठी अनेकदा बोटांचे ठसे घेतले जातात. त्यामुळे आधार अपडेट करतांना त्याबरोबरच पत्ताही अपडेट करणे आवश्यक आहे. आधार क्रमांक अपडेट करण्यासाठी आधारसेवा केंद्राची व्यवस्था आहे. नागरीकांनी आधार कार्ड अपडेट करण्यासाठी myaadhaar.uidai.gov.in या शासनाच्या संकेतस्थळाला भेट दयावी. आधार कार्ड अपडेट करण्यासाठी सेंटरवर जुने आधारकार्ड असणे गरजेचे आहे. ऑनलाईन पध्दतीने आधार कार्ड अपडेट करण्यासाठी आधार क्रमांक असणे गरजेचा आहे.

          पहिल्यांदा आधार कार्ड काढण्यासाठी आधार सेंटरवर जन्माचा दाखला, मतदान कार्ड व रहिवाशी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. 5 वर्षानंतर मुलाचे बायोमॅट्रीक पडताळणी करणे आवश्यक आहे. अन्यथा मुलाचे आधार कार्ड निष्क्रीय होते. या नियमांशी संबंधित सर्व माहिती आणि 5 वर्षानंतर मुलाच्या बोटाचे ठसे व डोळे स्कॅन करुन आधार अपडेट केले जाते. प्रत्येक व्यक्तीने 10 वर्षानंतर आपले आधार कार्ड अपडेट करणे गरजेचे असून लहान मुलांचे आधार कार्ड हे 5 वर्षानंतर अपडेट करणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास मुलांचे आधार कार्ड निष्क्रीय होऊ शकते. तरी नागरीकांनी आधार कार्ड काढून 10 वर्ष झाली असल्यास आपले आधार कार्ड अपडेट करावे. असे आवाहन श्रीमती पंत यांनी केले आहे.     

No comments

Powered by Blogger.