Welcome Reader

For Shopping Just Click Here

योगीराज सद्गुरू शिवायनम: स्वामी शतमानोत्सव पुण्यतिथी समारोह - Shivay Namah Math Karanja Lad News : Yogiraj Sadguru Shivay Nanamh Swami Shatmanotsav Punyatithi Celebration

योगीराज सद्गुरू शिवायनम: स्वामी शतमानोत्सव पुण्यतिथी समारोह - Shivay Namah Math Karanja Lad News : Yogiraj Sadguru Shivay Nanamh Swami Shatmanotsav Punyatithi Celebration


योगीराज सद्गुरू शिवायनम: स्वामी शतमानोत्सव पुण्यतिथी समारोह चे आयोजन 

२६ जानेवारी रोजी भव्य शोभायात्रा 

     कारंजा (www.jantaparishad.com) दि २४ - येथील शिवायनमः मठ संस्थान, कारंजा लाड (Shivay Namah Math Karanja Lad) अतीशय प्राचीन असून या मठाची स्थापना इ.स.१७४० मध्ये झाली आहे. या मठाचे तिसरे मठाधिपती योगीराज सद्गुरू शिवायनमः स्वामी यांनी इ.स. १९२३ मध्ये मठामध्ये संजीवन समाधी घेतली आहे. त्यांचा विदर्भ व संपूर्ण राज्यामध्ये फार मोठा भक्त संप्रदाय होता व आजही आहे. ते विज्ञानवादी होते तसेच त्यांना रसायनशास्त्राचे प्रचंड ज्ञान होते.यावर्षी सद्गुरू शिवायनमः स्वामी यांच्या संजीवन समाधीला १०० वर्ष पुर्ण होत आहे.त्यानिमीत्त भव्य शतमानोत्सव समारोहाचे आयोजन दि.२४ जानेवारी ते २७ जानेवारी दरम्यान करण्यात आले आहे. 

  • दि.२४ रोजी सकाळी कलश स्थापना व दुपारी  परमरहस्य ग्रंथाचे सामुहिक पारायण होणार आहे. 
  • दि. २५ रोजी दुपारी परमरहस्य ग्रंथाचे सामुहिक पारायण व सायंकाळी भजन गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. 
  • दि.२६ रोजी दुपारी ठीक ३.०० वाजता काशी जगद्गुरु श्री.श्री.श्री.१००८ डॉ.चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी तसेच विविध मठाचे मठाधिपती यांचे शहरामध्ये आगमन होणार आहे. दुपारी ४.०० ते सायंकाळी ७.०० पर्यंत जगद्गुरु व मठाधिपती यांचे उपस्थितीत शहरामध्ये भव्य शोभायात्राचे आयोजन करण्यात आले आहे. हि शोभायात्रा पोहा वेस येथुन निघुन समारोप शिवायनमः मठामध्ये होणार आहे. सायंकाळी ७.०० वाजता काशी जगद्गुरु महास्वामी यांचे आशिर्वचन होणार आहे. राञी ९.०० ते १०.०० दरम्यान सुगम संगीत भजन संध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 
  • दि.२७ जानेवारी रोजी सकाळी योगीराज सद्गुरू शिवायनमः स्वामी यांच्या समाधीला महारुद्राभिषेक व नंतर सद्गुरू गुरू गुरूलिंग स्वामी यांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. सकाळी १०.०० वाजता काशी जगद्गुरु, विविध मठाचे मठाधिपती तसेच वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना.श्री.संजय राठोड, माजी खासदार श्री.अनंतरावजी गुढे, कारंजा-मानोरा चे आमदार श्री.राजेंद्रजी पाटणी व मुर्तीजापुर येथील आमदार श्री.हरिष पिंपळे यांच्या उपस्थितीत धर्मसभा व आशिर्वचन व मान्यवराचे मनोगत होणार आहे. त्यानंतर महाप्रसाद होऊन कार्यक्रमाची सांगता होणार आहे.

        तरी वरील सर्व कार्यक्रमाला भाविक भक्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन मठाचे विद्यमान मठाधिपती श्री.ष.ब्र.१०८ मरुळसिध्द शिवाचार्य महाराज व विश्वस्त यांनी केले आहे.

Share on Google Plus

About Janta Parishad

    Blogger Comment
    Facebook Comment
Paris