आपला वाचक क्रमांक -

संत रविदास महाराज जयंती उत्सव व चर्मकार समाज मेळावा Sant Ravidas Maharaj Jayanti utsav charmkar samaj melava


कारंजा येथे ५ फेब्रुवारी रोजी

संत रविदास महाराज जयंती उत्सव व चर्मकार समाज मेळावा  

        कारंजा (www.jantaparishad.com) दि २४ - सामाजिक एकता, बंधुता आणि चर्मकार समाजाचे प्रबोधन या उद्देशाने कारंजा येथे येत्या 5 फेब्रुवारी रोजी  सकाळी 10 वाजता संत रविदास महाराज जयंती उत्सव व चर्मकार समाज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

        कारंजा ते मंगरूळपीर मार्गावरील रिलायन्स पेट्रोल पंप नजीकच्या महालक्ष्मी मंगलम सभागृहात गटशिक्षणाधिकारी श्रीकांत माने यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माधवराव गायकवाड हे उपस्थित असतील तर प्रमुख वक्त्या म्हणून अकोला येथील साहित्यिक,प्रतिज्ञाकार प्रभावी वक्त्या प्रा. डॉ.सौ निर्मलाताई भामोदे ह्या उपस्थित राहणार आहेत. शिवाय या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून वाशिम जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता डी.सी.खारोले, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे वाशिम जिल्हाध्यक्ष समाधान माने आणि राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे अमरावती जिल्हाध्यक्ष निलेश जामठे हे उपस्थित राहतील.

    या कार्यक्रमाला कारंजा शहर व तालुक्यातील चर्मकार समाज बंधू भगिनींनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या कारंजा तालुका शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.

Share on Google Plus

About Janta Parishad

    Blogger Comment
    Facebook Comment

Translate : हिंदी - ENGLISH - Other