Header Ads

वाशिम जिल्हयात ३० जानेवारी पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश - prohibition order in washim district

वाशिम जिल्हयात ३० जानेवारी पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश - prohibition order in washim district


वाशिम जिल्हयात ३० जानेवारी पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश

       वाशिम, दि. 17 (जिमाका) : जिल्हयात 23 जानेवारी रोजी बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी करण्यात येणार आहे. 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन व 28 जानेवारी रोजी मालेगांव तालुक्यातील श्रीक्षेत्र डव्हा येथे संत श्री नाथनंगे महाराज यांची यात्रा आहे. जिल्हयात विविध पक्ष/संघटना/ सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून वेगवेगळया मागण्याकरीता धरणे/आंदोलने/उपोषण करण्यात येत आहे. जिल्हा सण-उत्सवाच्या व राजकीय दृष्टिने संवेदनशील आहे. 

सण उत्सवाच्या काळात जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे सोयीचे व्हावे, यासाठी 30 जानेवारीपर्यंत जिल्हयात मुंबई पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) चे प्रतिबंधात्मक आदेश जिल्हादंडाधिकारी षण्मुगराजन एस.यांनी लागू केले आहे. हे आदेश कामावरील कोणतेही पोलीस अधिकारी किंवा इतर शासकीय/निमशासकीय अधिकारी- कर्मचारी किंवा विवाह, अंत्ययात्रा तसेच सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणूकीस व कार्यक्रमास लागू राहणार नाही.

No comments

Powered by Blogger.