Header Ads

'सारथी'तर्फे CSMS-DEEP पदविका अभ्यासक्रम मोफत - free diploma by sarathi

'सारथी'तर्फे CSMS-DEEP पदविका अभ्यासक्रम मोफत - free diploma by sarathi


मराठा, कुणबी तरुणांना सुवर्ण संधी 

'सारथी'तर्फे CSMS-DEEP पदविका अभ्यासक्रम मोफत 

वाशीम www.jantaparishad.com  दि. १७ : सारथी आणि महाराष्ट्र ज्ञान मंडळातर्फे छत्रपती संभाजी महाराज सारथी डिजिटल एम्प्लॉयबिलिटी एन्हान्समेंट प्रोग्राम अंतर्गत 'CSMS-DEEP' या रोजगाराभिमुख पदविका उपक्रमास प्रारंभ झाला आहे. मराठा, कुणबी, कुणबी-मराठा आणि मराठा-कुणबी या वर्गातील तरुणांना या अभ्यासक्रमाचा लाभ होणार आहे.

         तरुणांची रोजगारक्षमता व स्वयंरोजगार क्षमता वाढविणे, त्यांच्या कौशल्याची कमतरता भरून काढणे या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन केले आहे. विशिष्ट डिजिटल कौशल्ये, इंग्रजी भाषा कौशल्ये, संभाषण कौशल्ये आणि सॉफ्ट स्किल्स यावर प्रभुत्व मिळवून स्थानिक आणि जागतिक डिजिटल अर्थव्यवस्थेतील संधींसाठी तरुणांना विकसित केले जाणार आहे. या अभ्यासक्रमात प्रत्येकी १२० तासांचे ४ मॉड्यूल असतील. कार्यक्रम कालावधी ४८० तासांचा असून, सहा महिन्यांमध्ये हा अभ्यासक्रम पूर्ण करावा लागेल. अर्ज करण्यासाठी https://www. mkcl.org/csmsdeep या संकेत स्थळावर भेट द्यावी या अभ्यासक्रमांसाठी नोंदणीच्या तारखेस उमेदवाराचे वय १८ ते ४५ वर्षांदरम्यान असावे,उमेदवार किमान दहावी उत्तीर्ण असावा, आई-वडील, पालकांचे उत्पन्न प्रमाणपत्र आठ लाखांपेक्षा कमी असावे, महाराष्ट्र राज्य अधिवास प्रमाणपत्र, तसेच 'सारथी' ने नमूद केलेली वैध कागदोपत्री पुरावे सादर करावे लागणार आहेत.

           असे आवाहन MKCL वाशिम चे जिल्हा समन्वयक नरेश खंडारे (मो. ८६६९४९४१३६) व MKCL चे वरिष्ठ व्यवस्थापक डॉ. दिपक पाटेकर यांच्या वतीने करण्यात येत आहे.

No comments

Powered by Blogger.