पदवीधर मतदारसंघ निवडणूक : मतदानासाठी विशेष नैमीत्तीक रजा
वाशिम, www.jantaparishad.com दि. 20 (जिमाका) : भारत निवडणूक आयोगाने 29 डिसेंबर 2022 रोजीच्या प्रसिध्दी पत्रकाव्दारे महाराष्ट्र विधान परिषदेच्या अमरावती विभागाकरीता पदवीधर मतदार संघाच्या व्दिवार्षिक निवडणूकीचा कार्यक्रम घोषित केला आहे. या निवडणीकीचे मतदार 30 जानेवारी 2023 रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत व मतमोजणी 2 फेब्रुवारी 2023 रोजी होणार आहे.
अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूकीसाठी मतदार असलेल्या पदवीधर मतदारांना निवडणूकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावता येण्यासाठी मतदानाच्या दिवसाची विशेष नैमीत्तीक रजा देणे आवश्यक आहे. या संदर्भात राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या 23 जून 2011 रोजीच्या शासन निर्णयात तसेच संदर्भीय पत्रात या निवडणूकीच्या मतदारांना मतदानाच्या दिवशी विशेष नैमीत्तीक रजा मंजूर करण्यास तसेच ही रजा कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय असलेल्या नैमीत्तीक रजा व्यतिरिक्त असल्याचे नमुद केले आहे. तरी सर्व कार्यालयीन प्रमुखांनी आपल्या कार्यालयातील पदवीधर मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आपल्या स्तरावरुन 30 जानेवारी 2023 रोजी या रजेबाबत योग्य ती कार्यवाही करावी. असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी षण्मुगराजन एस. यांनी कळविले आहे.
Blogger Comment
Facebook Comment