आपला वाचक क्रमांक -

पदवीधर मतदारसंघ निवडणूक : मतदानाच्यावेळी एक ओळखपत्र सोबत असावे - identity card required for voting

पदवीधर मतदारसंघ निवडणूक : मतदानाच्यावेळी एक ओळखपत्र सोबत असावे - identity card required for voting


पदवीधर मतदारसंघ निवडणूक : मतदानाच्यावेळी एक ओळखपत्र सोबत असावे

      वाशिम, दि. 20 (जिमाका) : अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2022-23 व्दिवार्षिक निवडणूकीचा कार्यक्रम घोषित झाला आहे. या निवडणूकीकरीता मतदान 30 जानेवारी रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत होणार आहे. छायाचित्रासह मतदार ओळखपत्रावरील विसंगत छायाचित्रामुळे मतदाराची ओळख पटणे/पटविणे शक्य नसल्यास मतदारास पुढील प्रकारच्या कागदपत्रांपैकी एक ओळख कागदपत्र सादर करणे आवश्यक राहील.

         तरी मतदान करतांना आधार कार्ड, वाहन चालक परवाना, पॅनकार्ड, भारतीय पारपत्र, केंद्र/राज्य सरकार/ सार्वजनिक उपक्रम व पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना जारी केलेले फोटोसह सेवा ओळखपत्र, खासदारांना/आमदारांना जारी करण्यात आलेले अधिकृत ओळखपत्र, संबंधित शिक्षक आणि पदवीधर मतदार संघातील मतदार ज्या शैक्षणिक संस्थेत काम/नोकरी करीत आहेत, त्या शैक्षणिक संस्थांनी दिलेले फोटोसह सेवा ओळखपत्र, विद्यापिठाकडून वितरीत करण्यात आलेले मुळ पदवी/पदविका प्रमाणपत्र, सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले शारिरीक दिव्यांगत्वाचे मुळ प्रमाणपत्र व भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने वितरीत केलेले युनिक डिसॅबिलिटी ओळखपत्र यापैकी कोणतेही एक ओळखपत्र मतदारांनी मतदानाच्यावेळी मतदान केंद्रावर सोबत ठेवणे आवश्यक आहे. असे जिल्हा प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

Share on Google Plus

About Janta Parishad

    Blogger Comment
    Facebook Comment

Translate : हिंदी - ENGLISH - Other