Header Ads

सशस्त्र सेना ध्वज दिनानिमित्त कारंजात रक्तदान - Shashtra Sena Dwaj Din : Blood Donation Camp in Karanja lad



सशस्त्र सेना ध्वज दिनानिमित्त कारंजात रक्तदान

कॅप्टन अतुल एकघरे यांनी स्वतः रक्तदान करून केले उद्घाटन

        कारंजा लाड दि ०७ - उपजिल्हा रुग्णालय येथे दिनांक 7डिसेंबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता सशस्त्र सेना ध्वज दिनानिमित्त विदर्भस्तरीय रक्तदान शिबिर व्ही एन रेड्डी संशो धन आणि विकास प्रतिष्ठान च्या माध्यमातून व्ही एन रेड्डी रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन नागपूर द्वारे वाशिम जिल्ह्यातील रक्तदान हे कारंजा लाड येथे घेण्यात आले. या रक्तदान शिबिराचे अध्यक्षस्थान सर्व धर्म मित्र मंडळ तथा सास शोध व बचाव पथक अध्यक्ष डॉ श्याम रामदास सवाई तर उद्घाटक कॅप्टन तथा माजी सैनिक संघटना कारंजा अध्यक्ष अतुल एक घरे स्वःता रक्तदान करूण यांच्या हस्ते करण्यात आले. 

        यावेळेस प्रमुख पाहुणे म्हणून वैद्यकीय अधीक्षक डॉ भाऊसाहेब लहाने सर माजी सैनिक मधूकर राव खाडे गुरूजी  वाशिम सामान्य रुग्णालय येथील डॉ स्वप्नील हाके रक्त संकलन अधिकारी उप जिल्हा रुग्णालय कारंजा, सचिन दंडे जनसंपर्क अधिकारी, चंदन वासनिक वैज्ञानिक अधिकारी, कल्पना उलेमाले वैज्ञानिक अधिकारी, देवाश्री धडे परिचारीका, लक्ष्मण काळे परिचर, शेख अतीक रुग्ण वाहीका चालक यांची उपस्थिती होती. 



२१ रक्तदात्यांनी केले रक्तदान 

            सदर रक्तदान शिबिरामध्ये एकवीस रक्तदात्यांनी रक्तदानाचे कर्तव्य पार पाडले. यात कॅप्टन अतुल एकघरे साहेब. डॉ तृषार आडे, विशाल डाबरे, संदेश देवळे, करन सोनोने, तेजस सोनोने, रुषीकेश मुदे, मदन वाणी , राहूल मट्टा,  निशात सडेदार, प्रविण जाधव, सुमीत राऊत, रुषीकेश कामदार, सुयोग सावके, शिवकुमार चाटे, अजय ढोक, अश्वीन तायडे, दिपक सोनोने, हितेश ढोरे, लखन दिघडे, मोहम्मद मुनीवाले आदींनी रक्तदान केले.  रक्तदात्यांना आयोजकांकडून स्नेहभेट म्हणून टिफिन देण्यात आला. 

        सशस्त्र सेना ध्वज दिनानिमित्त एके दिवशी एकाच वेळी नागपूर, गोंदिया, भंडारा, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, वर्धा ,चंद्रपूर, गडचिरोली या जिल्यात रक्तदान शिबीर घेण्यात आले. वाशीम जिल्ह्यात  सदर शिबीर करीता कारजा लाड येथील श्याम सवाई याच्या मार्गदर्शन मध्ये ज्ञानेश्वर निघोट, मनोज मानके, वावगे, अमोल घोडेश्वार, अमोल गोडवे, कपिल धोटे, राजू खेती वाले, समीर शहा,  सर्व धर्म मित्र मंडळ सास शोध व बचाव पथक कारंजा चे विशेष सहकार्य मिळाले. व्ही एन आर रेड्डी रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन च्या प्रिया राजपूत, अजिंक्य गजभिये यांचे सहकार्य मिळाले

No comments

Powered by Blogger.