Header Ads

वाशिम जिल्हयात 22 डिसेंबरपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश - prohibition order till 22 december in washim district



वाशिम जिल्हयात 22 डिसेंबरपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश

       वाशिम, दि. 07 (जिमाका) : जिल्हयात एकूण 287 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम घोषीत झाला आहे. 18 डिसेंबर रोजी मतदान व 20 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. पोलीस स्टेशन रिसोड अंतर्गत ग्राम लोणी येथे संत सखाराम महाराज यांच्या 144 व्या पुण्यतिथीनिमित्त 10 डिसेंबर 2022 पर्यंत यात्रा कार्यक्रम चालणार आहे.  जिल्हयात विविध पक्ष/संघटना/ सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून वेगवेगळया मागण्याकरीता धरणे/आंदोलने/उपोषण करण्यात येत आहे. जिल्हा सण-उत्सवाच्या दृष्टिने व राजकीय दृष्टिने संवेदनशील आहे. 

        सण उत्सवाच्या काळात जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे सोयीचे व्हावे यासाठी 8 ते 22 डिसेंबरपर्यंत जिल्हयात मुंबई पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) चे प्रतिबंधात्मक आदेश जिल्हादंडाधिकारी षण्मुगराजन एस.यांनी लागू केले आहे. 

        हे आदेश कामावरील कोणतेही पोलीस अधिकारी किंवा इतर शासकीय/निमशासकीय अधिकारी- कर्मचारी किंवा विवाह, अंत्ययात्रा तसेच सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणूकीस व कार्यक्रमास लागू राहणार नाही.

No comments

Powered by Blogger.