Header Ads

वाशिम जिल्हयाच्या रौप्य महोत्सवानिमित्त सभा - Silver Jubilee year of Washim District : Meeting for the occasion

Silver Jubilee of Washim District : Meeting for the occasion  : वाशिम जिल्हयाच्या रौप्य महोत्सवानिमित्त सभा


वाशिम जिल्हयाच्या रौप्य महोत्सवानिमित्त सभा

जिल्ह्याचा नावलौकिक करणारे होणार सन्मानित; रौप्य महोत्सव लोगोचे विमोचन

        वाशिम, दि. 9 www.jantaparishad.com (जिमाका) - वाशिम जिल्हयाच्या निर्मितीला 1 जुलै 2023 रोजी 25 वर्ष पुर्ण होत आहे. वाशिम जिल्हयाचा रौप्य महोत्सव साजरा (Silver Jubilee of Washim District) करण्यासाठी 7 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी षन्मुगराजन एस. यांच्या अध्यक्षतेखाली वाकाटक सभागह येथे सभेचे आयोजन करण्यात आले. सभेला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत,अपर जिल्हाधिकारी  शहाजी पवार,निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, उद्योगपती अविनाश जोगदंड, समाजसेवक अविनाश मारशेटवार व उद्योजक देवेंद्र खडसे यांची प्रमुख उपस्थिती होती.

        श्री. षन्मुगराजन यावेळी म्हणाले, ज्यांनी 25 वर्षात आपल्या कर्तत्वाने एक वेगळी ओळख निर्माण करुन जिल्हयाचा नावलौकीक केला आहे, अशा विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेण्यात यावा.रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने त्यांना सन्मानीत करता येईल.जिल्हयाच्या विकासात ज्यांनी महत्वाची भूमिका पार पाडली आहे,त्यांची माहिती जगभर जावी.प्रत्येक गावातून त्या गावातील शाळेत शिक्षण घेवून वेगवेगळ्या क्षेत्रात आपली कर्तबगारी सिध्द केली आहे अशांचा देखील शोध घेण्यात यावा.जिल्हा स्थापनेच्या 25 वर्षाच्या निमित्ताने विविध उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात यावे.सर्व यंत्रणांनी यासाठी पुढाकार घ्यावा. असेही ते यावेळी म्हणाले.

        श्रीमती पंत म्हणाल्या,जिल्हयातील चांगले काम करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेवून त्यांचा सन्मान करण्यात यावा.

        श्री. जोगदंड म्हणाले,जिल्ह्यात विविध 8 ते 9 प्रकारचे पर्यटन होवू शकते.या  पर्यटनाला चालना दिल्यास पर्यटक जिल्हयात येतील.त्यामुळे पर्यटन क्षेत्रातून स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

         श्री.मारशेटवार म्हणाले,जिल्हयाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हयातील कर्तृत्ववान व्यक्तीचा सन्मान करण्यात येईल.जिल्हयातील ऐतिहासिक,धार्मिकस्थळांची ओळख जगभर झाली पाहिजे.जिल्हयातील कर्तबगार 25 महिलांचा शोध घेवून त्यांना देखील सन्मानीत करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

        यावेळी मान्यवरांच्या हस्ते जिल्ह्याच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या लोगोचे विमोचन करण्यात आले.

       सभेला विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी,सर्व तहसिलदार,बाळू मेहकरकर,मनीष मंत्री,नारायण सोळंके,गिरीधारीलाल सारडा,संगीता इंगोले,रेडीओ वत्सगुल्मचे इरफान सैय्यद,देवानंद इंगोले,श्री.मालपाणी यांची उपस्थिती होती.

No comments

Powered by Blogger.