Header Ads

उद्योजकता विकास केंद्राकडून महिलांसाठी ब्युटीपार्लर प्रशिक्षण - Beauty Parlor Training for Women by MCD washim district

उद्योजकता विकास केंद्राकडून महिलांसाठी ब्युटीपार्लर प्रशिक्षण - Beauty Parlor Training for Women by MCD washim district


उद्योजकता विकास केंद्राकडून महिलांसाठी ब्युटीपार्लर प्रशिक्षण

१२ नोव्हेंबर पर्यंत अर्ज मागविले 

        वाशिम,दि.9 www.jantaparishad.com (जिमाका) - महाराष्ट्र उद्योजकता विकास केन्द्र आणि जिल्हा उद्योग केन्द्र वाशिमच्या वतीने जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवती व महिलांसाठी "वाशिम" येथे सर्वसाधारण योजना सन २०२२-२३ अंतर्गत सहशुल्क स्वरूपाच्या " ब्युटीपार्लर (ब्युटी अंड वेलनेस) " (Beauty Parlor (Beauty and Wellness)) आधारित तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

               सुशिक्षित बेरोजगारांना उद्योजकता विकास व तांत्रिक प्रशिक्षण देऊन त्यांना स्वतःचा स्वयंरोजगार - रोजगार निर्माण करण्यास प्रवृत्त करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. याकरिता "ब्युटीपार्लर (ब्युटी अंड वेलनेस )" प्रशिक्षण कार्यक्रमामधुन सहभागी प्रशिक्षणार्थ्यांना ब्युटीशियन (Technician), हेअर अॅंड स्कीन केअर (Hair and Skin Care), हेअर कट (Hair Cut),  हेअर स्टाईल (Hair Style), हेअर वाश (Hair Wash), हेड मसाज (Head Massage) मेहंदी थ्रेडिंग (Mehandi Threading), वॅक्सिंग (Waxing), फेशिअल (Facial), मेनिक्युअर (Manicure), पेडीक्युअर (Pedicure), ब्लिच (Bleach), फेरा क्लीन अप (Fera Clean Up), मेकअप ( Makeup) ई. विषयी थेअरी व प्रात्यक्षीक स्वरूपात प्रशिक्षण दिले जाणार आहे.शिवाय उद्योजकता विकास प्रशिक्षण ज्यामध्ये उद्योजकीय व्यक्तिमत्व विकास, उद्योग उभारणी व व्यवस्थापन, बाजारपेठ पाहणी व व्यवस्थापन, विविध कर्ज योजना व कर्ज प्रकरण तयार करणे, बँकेचे व्यवहार,प्रकल्प अहवाल तयार करणे ई. विषयी तज्ञ व अधिकारी वर्गामार्फत मार्गदर्शन केले जाणार आहे.  

        १ महिन्याचा हा कार्यक्रम असून यशस्वीरीत्या प्रशिक्षण पूर्ण करण्याऱ्या प्रशिक्षणार्थीला प्रमाणपत्रासह देवून विनामुल्य सीएमई व पीएमई योजनेद्वारे ऑनलाईन कर्ज प्रकरणे बँकेला पाठवून ३५% अनुदानाचा लाभ मिळेल.प्रशिक्षणार्थीना स्वत:चे ब्युटीपार्लर सुरु करण्यास आर्थिक लाभ होईल. या प्रशिक्षणासाठी ४० प्रशिक्षणार्थ्यांची निवड केली जाणार आहे.कार्यक्रमासाठी प्रशिक्षणार्थी हा किमान ७ वा वर्ग पास, किंवा पदवी / पदविका / आय.टी. आय. प्रमाणपत्र किंवा कौशल्यावर आधारित व्यावसायिक अभ्यासक्रम प्रमाणपत्र धारक असावा. सर्वसाधारण प्रवर्गासाठी १८ ते ४५ वयोगट, लाभार्थी वाशिम जिल्ह्यातील रहिवासी असावा, प्रवेशासाठी (MCED Portal) एम.सी.ई.डी. चे पोर्टल www.mced.in वर ऑनलाईन प्रवेश (Online Admission Application) अर्ज करणे आवश्यक. तरी सदर कार्यक्रमामध्ये इच्छुकांनी शैक्षणिक कागदपत्रासह शाळा सोडल्याचा दाखला,आधार कार्ड, मागासवर्गीय असल्यास जातीचे प्रमाणपत्र,स्वतःचे नावे असलेले बॅक खाते पासबुकाची सत्यप्रत व दोन फोटो या कागदपत्रांसह ब्युटीशियन मिना वानखेडे( ८८८८६३६०६९) कार्यक्रम आयोजक खुशाल रोकडे यांच्याशी १२ नोव्हेंबर २०२२ पूर्वी संपर्क साधावा किंवा अधिक माहितीसाठी प्रकल्प अधिकारी,एम.सी.ई.डी.कार्यालय, काळे कॉम्प्लेक्स,काटा रोड, वाशिम फो.नं. ०७२५२-२३२८३८ यांच्याशी संपर्क करावा.असे आवाहन महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी प्रसन्न रत्नपारखी यांनी केले आहे.

No comments

Powered by Blogger.