Header Ads

शकुंतला रेल्वेच्या नेरोगेज चे ब्रॉडगेज मध्ये रूपांतरण होणार - Shakuntala railway MLA Rajendra Patni news

Shakuntala railway MLA Rajendra Patni news - शकुंतला रेल्वेच्या नेरोगेज चे ब्रॉडगेज मध्ये रूपांतरण होणार


मूर्तिजापूर -यवतमाळ आणि मूर्तिजापूर-अचलपूर नेरोगेज चे ब्रॉडगेज रूपांतरण होणार 

सर्वेक्षणाच्या कामाला मंजुरात - आमदार राजेंद्र पाटणी यांची माहिती 

        वाशिम दि २२ (www.jantaparishad.com) - विदर्भातील जनतेच्या जिव्हाळयाच्या असलेल्या मूर्तिजापूर यवतमाळ (Murtijapur Yavatmal)मूर्तिजापूर अचलपूर (Murtijapur Achalpur) या शकुंतला रेल्वे लाईन (Shakuntala Railway Line) नेरोगेज चे ब्रॉडगेज (Narrow Gauge To Broad Gauge) मध्ये रूपांतर करण्याबाबत आमदार राजेंद्र पाटणी (MLA Rajendra Patni) यांनी रेल्वे मंत्री मा. रावसाहेबजी दानवे पाटील यांनी लेखी पत्रा द्वारे मागणी केली होती.

mla rajendra patni news Shakuntala Railway शकुंतला रेल्वेच्या नेरोगेज चे ब्रॉडगेज मध्ये रूपांतरण होणार


        सदर मागणीचा विचार करून मा. रावसाहेबजी दानवे पाटील रेल्वे राज्यमंत्री भारत सरकार यांनी त्यावर तात्काळ कार्यवाही करून सदर रेल्वे मार्गच्या कामाला गती दिली आहे. यवतमाळ-मूर्तिजापूर 113 किमी, मूर्तिजापूर -अचलपूर 77 किमी आणि आर्वी-पुलगाव 35 किमी असे एकूण 225 किमी नेरोगेज रेल्वे विभाग हे शकुंतला रेल्वेचे भाग आहेत. मध्य प्रांत रेल्वे मंत्रालयाने कंपनी ला विशेष खरेदीची नोटीस देऊन सीपीआर सोबतचा करार निश्चित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे रेल्वे राज्यमंत्री मा. रावसाहेबजी दानवे  (Railway Minister Raosaheb Danve) यांनी आमदार राजेंद्र पाटणी यांनी लेखी पत्रद्वारे कळविले आहे.  

MLA Rajendra Patni Karanja Manora constituency

        तसेच मूर्तिजापूर-यवतमाळ आणि मूर्तिजापूर-अचलपूर नेरोगेज विभागाच्या गेज रूपांतरणासाठी अंतिम सर्वेक्षणाचा प्रस्तावस मंजुरात देण्यात आल्याचे सुद्धा त्यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे. यामुळे लवकरच ह्या मार्ग च्या कामाला आरंभ होईल असे आमदार पाटणी म्हणाले.

        उपरोक्त नेरोगेज रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेज मध्ये रूपांतर झाल्यास विदर्भातील जनतेला व व्यावसायिकाना मोठा उपयोगाचा ठरवून विदर्भाच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे

No comments

Powered by Blogger.