Header Ads

कायमस्वरूपी उपविभागीय अधिकाऱ्याची नियुक्ती करावी - Permanent SDO should be appointed



कायमस्वरूपी उपविभागीय अधिकाऱ्याची नियुक्ती करावी

कारंजा विधीज्ञ मंडळाची मागणी ; राज्य शासनाला निवेदन

        कारंजा दि २२ - कारंजा उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे कारंजा व मानोरा या दोन तालुक्याचा कारभार आहे. मात्र मागील काही महिन्यांपासून कायमस्वरूपी उपविभागीय अधिकारी नसल्यामुळे येथील कारभार प्रभारी अधिकारी यांच्याकडे असल्याने अनेक प्रकारच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. तरी कायमस्वरूपी उपविभागीय अधिकाऱ्याची नियुक्ती करावी अशी मागणी विधीज्ञ मंडळाच्या वतीने राज्य शासनाकडे तहसीलदार यांच्या मार्फत करण्यात आली आहे. 

        निवेदनात नमूद केले आहे की, कारंजा व मानोरा या दोन तालुक्याकरिता कारंजा येथे उपविभागीय अधिकारी महसुल यांचे कार्यालय असून मागील १ वर्षापासून म्हणजेच दिनांक २०/४/२०२२ पासून नियमीत उपविभागीय अधिकारी महसुल यांची नियुक्ती झालेली नाही, तरी उपविभागीय कार्यालयामध्ये मंगरूळपीर येथील उपविभागीय अधिकारीला तात्पुरत्या स्वरूपात चार्ज दिलेला होता, परंतु उपविभागीय अधिकारी मंगरूळपीर हे सुध्दा उपलब्ध नाही. तरी, कार्यालयामध्ये उपविभागीय अधिकारीचे तात्पुरते चार्ज कारंजा येथील तहसिलदार साहेबांना देण्यात आलेले आहे. तरी, तहसिलदार साहेब यांना अपिलीय महसुल प्रकरणाबाबत उपविभागीय अधिकारी म्हणून काम करण्याचे अधिकार नाही. तरी मागील १ वर्षापासून कारंजा व मानोरा तालुक्यातील सर्व प्रकरणे ठप्प झालेली असून आम नागरीकांना व विधिज्ञांना न्यायालयीन कामकाजाबद्दल भयंकर त्रास आणि अडथळा सहन करावा लागत आहे. तसेच तालुका कारंजा व मानोरा येथील न्यायालयीन प्रकरणे वाशिम येथे चालविण्याकरीता ट्रांसफर करण्याचे अशी माहिती आम्हाला मिळाली असून जर असे झाले तर, दोन तालुक्यातील आम नागरीकांना आर्थिक, मानसिक व शारिरीक स्वरूपाचे भयंकर त्रासाला तोंड द्यावे लागेल, याची आपण दखल घेऊन त्वरीत कारवाई करावी. वरील सर्व परिस्थिती लक्षात घेऊन सन्माननिय महोदयांनी आमच्या अर्जाची दखल घेऊन कारंजा तालुका येथे कायमस्वरूपी उपविभागीय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. 

    निवेदन सादर करतांना विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष ॲड. सुभान खेतीवाले, उपाध्यक्ष ॲड. मिलिंद खंडारे, सचिव ॲड.आतिश चौधरी, कोषाध्यक्ष ॲड. अनिल पवार यांच्या सह विधीज्ञ मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

No comments

Powered by Blogger.