Header Ads

११ नोव्हेंबर रोजी वाशिम येथे कायदेविषयक जनजागृती महाशिबीर : हक हमारा भी तो है - Haq Hamara Bhi To Hai

११ नोव्हेंबर रोजी वाशिम येथे कायदेविषयक जनजागृती महाशिबीर : हक हमारा भी तो है - Haq Hamara Bhi To Hai


११ नोव्हेंबर रोजी वाशिम येथे कायदेविषयक जनजागृती महाशिबीर

नागरीकांना मिळणार योजनांची माहिती; नागरिकांनी शिबिराचा लाभ घ्यावा

        वाशिम, दि. 9 (जिमाका) - जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या वतीने पॅन इंडिया अंतर्गत नागरिकांचे सक्षमीकरण आणि " हक हमारा भी तो है " (Haq Hamara Bhi To Hai) या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 11 नोव्हेंबर 2022 रोजी वाशिम येथे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील जिल्हा नियोजन सभागृह येथे  कायदेविषयक जनजागृती महाशिबीराचे आयोजन सकाळी 10.30 वाजता केले आहे. 

        या शिबीरामध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत देण्यात येणाऱ्या विधी सेवा, महिलांसंबंधीचे कायदे, ज्येष्ठ नागरिकांचे कायदे,बालकांचे कायदे यासह शासनाच्या विविध योजनांची माहिती नागरीकांना आणि लाभार्थ्यांना मिळणार आहे. 

        या महाशिबिरात शासनाच्या विविध विभागाचे  स्टॉल असणार आहे.या स्टॉलला भेटी देणाऱ्या नागरीकांना त्या विभागाच्या योजनांची माहिती असलेली घडीपुस्तिका, पॉम्प्लेट्स व माहिती  पुस्तिकांचे वितरण करण्यात येणार आहे. तसेच संबंधित विभागाचे अधिकारी-कर्मचारी स्टॉलला भेट देणाऱ्या नागरीकांना योजनांची माहिती देतील.यावेळी शासनाच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांना लाभ देण्यात येईल.

        7 नोव्हेंबर रोजी या शिबीराच्या निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयातील  वाकाटक सभागृह येथे जिल्हाधिकारी षन्मुगराजन एस. यांच्या अध्यक्षतेखाली सभेचे आयोजन करण्यात आले.या सभेला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सदस्य सचिव न्या. विजय टेकवाणी,अपर जिल्हाधिकारी शहाजी पवार,निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांची  प्रमुख उपस्थिती होती.

        जिल्हाधिकारी श्री.षन्मुगराजन यावेळी म्हणाले, विविध विभाग हे त्यांच्याकडून राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती त्यांच्या  स्टॉलच्या माध्यमातून नागरीकांना व लाभार्थ्यांना देतील.सद्यास्थितीत त्यांच्याकडून ज्या योजना राबविण्यात येतात त्यांची  माहिती  द्यावी.असे त्यांनी यावेळी सांगितले.

        श्री. टेकवाणी म्हणाले,सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार महसूल विभाग आणि ग्रामविकास  विभाग यांनी तसेच इतरही विभागांनी हे कायदेविषयक जनजागृती महाशिबीर यशस्वीतेसाठी सहकार्य करावे. नागरीकांना व लाभार्थ्यांना कायदेविषयक माहिती तसेच विविध शासकीय योजनांची  माहिती या शिबीराच्या माध्यमातून मिळण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

        सभेला विविध विभागाचे प्रमुख अधिकारी,उपविभागीय अधिकारी व सर्व तहसिलदार उपस्थित होते.

No comments

Powered by Blogger.