Header Ads

वाशिम जिल्ह्यात २३ सप्टेंबरपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश - Washim district - Prohibitory order till 23 Sept

News washim district, karanja lad, risod, manora, mangrulpir, malegaon


वाशिम जिल्ह्यात २३ सप्टेंबरपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश

     वाशिम, दि. 08 (जिमाका) : जिल्ह्यात 31 ऑगस्ट रोजी श्री गणेश स्थापना झालेली आहे. स्थापना केलेल्या श्री गणेश मुर्तीचे 9 सप्टेंबर ते 11 सप्टेंबर 2022 या कालावधीत सार्वजनिक स्वरुपात मिरवणूका काढून विसर्जन करण्यात येणार आहे. मागील दोन वर्ष कोरोना संसर्गामुळे श्री गणेशोत्सव सार्वजनिक स्वरुपात साजरा करण्यात आला नाही. यावर्षी मोठया उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे.

         सद्यस्थितीत जैन धर्मियांचे आचार्य श्री. विद्यासागरजी महाराज हे शिरपूर (जैन) येथे चातुर्मासानिमित्त वास्तव्यास आहे. शिरपूर (जैन) येथे चातुर्मासाच्या काळात विविध धार्मीक कार्यक्रम व प्रवचनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. याकरीता मोठया प्रमाणात जैन धर्मीय भाविक शिरपूर येथे येत आहे. वाशिम जिल्हा सण-उत्सवाच्या दृष्टिने संवेदनशील आहे. सण उत्सवाच्या काळात जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे सोयीचे व्हावे यासाठी 9 सप्टेंबरपासून ते 23 सप्टेंबरपर्यंत मुंबई पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) चे प्रतिबंधात्मक आदेश जिल्हादंडाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिले आहे. हे आदेश कामावरील कोणतेही पोलीस अधिकारी किंवा इतर शासकीय/निमशासकीय अधिकारी- कर्मचारी किंवा विवाह, अंत्ययात्रा तसेच सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणूकीस व कार्यक्रमास लागू राहणार नाही.

No comments

Powered by Blogger.