वाशिम जिल्हयातील २ लक्ष २४ हजार मतदार ओळखपत्र आधार क्रमांकाशी जोडले Voter ID card link with Aadhaar number of Washim district
वाशिम जिल्हयातील २ लक्ष २४ हजार मतदार ओळखपत्र आधार क्रमांकाशी जोडले
वाशिम, दि. 01 (जिमाका) : भारत निवडणूक आयोगाने कालबध्द पध्दतीने मतदारांकडून आधार क्रमांक प्राप्त करुन घेण्यासाठी मतदार ओळखपत्राचे आधार क्रमांकाशी जोडणी (Voter ID card link with Aadhaar number) करण्याचा कार्यक्रम 1 ऑगस्टपासून निश्चित केला आहे. मतदार यादीतील मतदारांना त्यांचा आधार क्रमांक भरण्यासाठी नमुना अर्ज-6 (ब) तयार करण्यात आला आहे. 1 ऑगस्ट 2022 पासून मतदार ओळखपत्राला आधार क्रमांक जोडण्याची विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. वाशिम जिल्हयातील सर्व सहा तालुक्यातील (total number of voters of Washim district of all the six talukas 9 lakhs 52 thousand 545) 9 लक्ष 52 हजार 545 मतदारांपैकी 1 सप्टेंबर 2022 पर्यंत 2 लक्ष 24 हजार 436 मतदार ओळखपत्र हे आधार क्रमांकाशी जोडण्यात आले आहे.
आतापर्यंत एकूण मतदारांपैकी मतदार ओळखपत्राला आधार क्रमांक जोडणी केलेल्या मतदारांची संख्या तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे.
- Manora Taluka मानोरा तालुका - एकूण मतदार 1 लक्ष 23 हजार 290 (total voters 1,23,290) त्यापैकी आधार क्रमांकाशी जोडलेले मतदार 43 हजार 339,
- Karanja lad Taluka कारंजा तालुका - एकूण मतदार 1 लक्ष 78 हजार 169 (total voters 1,78,169) त्यापैकी आधार क्रमांकाशी जोडलेले मतदार 52 हजार 560,
- Risod Taluka रिसोड तालुका - एकूण मतदार 1 लक्ष 60 हजार 87 (Total voters 1,60,087) त्यापैकी आधार क्रमांकाशी जोडलेले मतदार 45 हजार 995,
- Mangrulpir Taluka मंगरुळपीर तालुका - एकूण मतदार 1 लक्ष 38 हजार 738 (Total voters 1,38,738) त्यापैकी आधार क्रमांकाशी जोडलेले मतदार 36 हजार 460,
- Malegaon Taluka मालेगांव तालुका - एकूण मतदार 1 लक्ष 45 हजार 768 (Total voters 1,45,768) त्यापैकी आधार क्रमांकाशी जोडलेले मतदार 19 हजार 421
- Washim Taluka वाशिम तालुका - एकूण मतदार 2 लक्ष 6 हजार 493 (Total Voters 2,06,493) त्यापैकी आधार क्रमांकाशी जोडलेले मतदार 26 हजार 661 इतके आहे.
जिल्हयात मानोरा तालुक्यात सर्वाधिक 43 हजार 339 मतदार ओळखपत्र आधार क्रमांकाशी जोडण्यात आले आहे. ही टक्केवारी 35.15 टक्के इतकी आहे.
मतदार यादीतील विद्यमान मतदारांना त्यांचा आधार क्रमांक भरण्यासाठी नमुना अर्ज ६-ब (application 6-b to link voter id card to aadhar number) तयार करण्यात आला आहे. अर्ज क्रमांक ६-ब हा भारत निवडणूक आयोगाच्या (website link to eci - eci.gov.in) आणि मुख्य निवडणूक आयोगाच्या ceoelection.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. मतदारांना ऑनलाईन पध्दतीने आधार क्रमांक भरण्यासाठी अर्ज क्रमांक ६-ब हा ERO Net, GARUDA, NVSP (National Voter's Service Portal), VHA माध्यमांवर देखील उपलब्ध आहे. अर्ज ६-ब छापील प्रती देखील उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. आधार क्रमांक (aadhar number) सादर करणे हे मतदारांना ऐच्छीक आहे. अर्ज क्रमांक ६-ब बिएलओ यांचे मार्फतही घरोघरी भेटी देऊन गोळा करण्यात येत आहे.
मतदारांकडे आधार क्रमांक नसल्यास अर्ज क्रमांक ६- ब मध्ये दर्शविलेल्या ११ पर्यायी कागदपत्रांपैकी एक कागदपत्र सादर करता येईल. उदा. मनरेगा जॉबकार्ड (nrega Jobcard), बँक अथवा पोस्ट ऑफीस कार्यालयाकडून निर्गमित केलेले फोटोसहीत पासबुक, आरोग्य विमा स्मार्टकार्ड (Health Insurance Smartcard), ड्रायव्हींग लायसन्स (Driving license), पॅनकार्ड (Pan card), एनपीआर अंतर्गत आरबीआयमार्फत वितरीत केलेले स्मार्टकार्ड (NPR RBI Smartcard), भारतीय पासपोर्ट (passport), फोटोसहीत पेन्शन कागदपत्रे, केंद्र व राज्य शासन कर्मचाऱ्यांचे छायाचित्रासह ओळखपत्र, सामाजिक न्याय विभागाकडील ओळखपत्र इत्यादी मतदार यादीशी आधार क्रमांकाची जोडणी करणे ऐच्छीक आहे. केवळ आधार क्रमांक (aadhar number) सादर करण्यास असमर्थतेमुळे मतदार यादीतून नाव काढले जाऊ शकत नाही. जिल्हयातील सर्व मतदार ओळखपत्राचे आधार क्रमांकाशी जोडण्याचे काम येत्या 10 सप्टेंबरपर्यंत कोणत्याही परिस्थीतीत पुर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना दिले आहे.
Post a Comment