१ ते ३० सप्टेंबरपर्यंत राष्ट्रीय पोषण महिना - National Nutrition Month Rashtriy Poshan Maah Mahina marathi
राष्ट्रीय पोषण महिना
National Nutrition Month
Rashtriya Poshan Maah / Mahina
१ ते ३० सप्टेंबरपर्यंत : विविध उपक्रमांचे आयोजन
वाशिम, दि. 01 www.jantaparishad.com (जिमाका) : महिला आणि बालकांचे पोषण व आरोग्य स्थितीमध्ये सुधारणा घडवून आणण्याच्या दृष्टीने 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीत राष्ट्रीय पोषण महिना (National Nutrition Month) म्हणून साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. राष्ट्रीय पोषण महिना (Rashtriya Poshan Mahina / maah) म्हणून साजरा करतांना महिला व आरोग्य, बालक व शिक्षण- पोषणाबरोबर शिक्षण देखील, लिंग संवेदनशिलता, जलसंधारण आणि व्यवस्थापन आणि आदिवासी भागातील महिला व मुलांकरीता पारंपारीक खाद्य पदार्थ या चार प्रमुख संकल्पना केंद्र शासनाने सुचविल्या आहे.
- 1 सप्टेंबर- पोषण महिना उदघाटन समारंभ, या दिवशी पोषण महिना उदघाटन समारंभाचे जिल्हा, तालुका व अंगणवाडी (anganwadi) स्तरावर आयोजन करणे.
- 2 सप्टेंबर- गाव व तालुकास्तरावर पोषण रॅलीचे आयोजन करणे, यामध्ये अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, आशावर्कर (asha worker), ग्राम स्वच्छता, पाणी पुरवठा व आरोग्य समिती, ग्रामपंचायत यांचा सहभाग घेणे.
- 3 सप्टेंबर- गणेशोत्सव देखाव्यामध्ये सार्वजनिकस्तरावर पोषण अभियानाचा प्रचार-प्रसिध्दी करण्यासाठी गणेशोत्सव मंडळाच्या मंडपामध्ये बॅनर लावणे.
- 4 सप्टेंबर- अंगणवाडी केंद्र (anganwadi kendra), शाळा, ग्रामपंचायत, पंचायत समिती व सार्वजनिक जागांवर औषधीयुक्त वनस्पतींचे वृक्षरोपण करुन पोषण वाटीका तयार करणे.
- 5 सप्टेंबर- 5 ते 20 सप्टेंबर या कालावधीत सॅम व मॅम बालकांचा (Sam and Mam children) गाव व तालुकास्तरावर शोध घेऊन तपासणी करणे.
- 6 सप्टेंबर- अंगणवाडी केंद्र व घरोघरी योग शिबीराचे आयोजन करण्यास जनजागृती करणे तसेच गरोदरमाता व किशोरवयीन मुलींकरीता अंगणवाडीमध्ये योग शिबीराचे आयोजन करणे.
- 7 सप्टेंबर- ॲनिमियामुक्त भारताच्या अनुषंगाने गावपातळीवर गरोदर स्त्रियांची तपासणी, उपचार व समुपदेशन करणे.
- 8 सप्टेंबर- पुरक पोषण आहारासंदर्भात माहितीपट व व्हिडीओच्या माध्यमातून आरोग्य विभागाच्या मदतीने जनजागृती करणे.
- 9 सप्टेंबर- गरोदर स्त्रिया, स्तनदा माता व सहा वर्षाखालील बालकांसाठी व किशोरवयीन मुलींसाठी ॲनिमिया तपासणी शिबीराचे आयोजन करणे व त्यांच्यावर उपचार करणे. तसेच आयएफए गोळयांचे व जंतनाशक गोळयांचे वाटप करणे.
- 10 सप्टेंबर- प्राथमिक आरोग्य केंद्र, सामुदायीक आरोग्य केंद्रस्तरावर गरोदर व स्तनदा मातांकरीता आहाराबाबत समुपदेशन, मार्गदर्शन व प्रात्यक्षीकाचे आयोजन करणे.
- 11 सप्टेंबर- अंगणवाडी केंद्रामध्ये दुषित पाण्यापासून होणारे आजार, गरोदर व स्तनदा माता व कुटूंबामध्ये याबाबत जनजागृती निर्माण करणे, डायरीया झालेल्या बालकांसाठी पोषण व काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन करणे.
- 12 सप्टेंबर- बालकांमध्ये बुटकेपणा, तीव्र कुपोषितपणा, ॲनिमिया, जंत, कमी वजन, प्रतिकारशक्ती कमी असणे या बाबींना टाळण्यासाठी कुपोषण रोखण्यासाठी आयुष संदर्भातील विविध उपक्रम व साहित्याचा वापर करुन विविध शिबीरांचे आयोजन करणे.
- 13 सप्टेंबर- हात धुणे व वैयक्तिक स्वच्छतेवर आधारीत कार्यक्रमाचे अंगणवाडी, ग्रामपंचायत व शाळास्तरावर आयोजन करणे.
- 14 सप्टेंबर- अंगणवाडीस्तरावर विविध पौष्टीक आहाराचे पाककृती प्रदर्शनाचे आयोजन करुन आहाराबाबत जाणिव जागृती मोहिम राबविणे.
- 15 सप्टेंबर- बदलत्या जीवनशैलीच्या अनुषंगाने होणाऱ्या आजारापासून बचावाबाबत अंगणवाडीमध्ये मार्गदर्शन करणे.
- 16 सप्टेंबर- किशोरवयीन मुलींकरीता मासिक पाळी संदर्भात मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करणे.
- 17 सप्टेंबर- गरोदर व स्तनदा माता यांच्याकरीता स्तनपाना संदर्भात मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करणे.
- 18 सप्टेंबर- पोषण समुपदेश केंद्रामध्ये (Nutrition Counseling Center) बालकांना दाखल करणे.
- 19 सप्टेंबर- पोषण घटकांची कमतरता त्यामुळे होणारे दुष्परीणाम याबाबत वादविवाद स्पर्धा, वकृत्व स्पर्धा व पोषण प्रश्नोत्तरीचे आयोजन करणे.
- 20 सप्टेंबर- सुदृढ बालक स्पर्धेचे आयोजन करणे.
- 21 सप्टेंबर- गावपातळीवर बडी मदर्स कॉन्सेप्ट चे प्रमोशन करणे.
- 22 सप्टेंबर- बालकांमधील मधुमेह शोधण्याकरीता तपासणी करणे.
- 23 सप्टेंबर- ग्रामस्तरावर जन्मलेल्या मुलींचे स्वागत, पालकांचे सत्कार व मुलींच्या नावाने वृक्षारोपण करणे.
- 24 सप्टेंबर- गावपातळीवर महिला ग्रामसंघ व बचतगटांच्या पदाधिकारी यांची गरम ताजा आहाराबाबत चर्चा करणे.
- 25 सप्टेंबर- गरोदर स्त्रिया यांचे आयएफए गोळयांचे नियमित सेवनाबाबत व पोषणाबाबत समुपदेशन करणे.
- 26 सप्टेंबर- गावस्तरावर अंगणवाडी सेविका, आशा वर्कर व आरोग्य सेविका (Health care worker) यांच्या गृह भेटीतून स्थानिक पोषक आहाराबाबत जनजागृती करणे व गृह भेटी देणे.
- 27 सप्टेंबर- अंगणवाडीस्तरावर ऑनलाईन पूर्व शालेय शिक्षण कृती करणे.
- 28 सप्टेंबर- बालकांचे लसीकरण (Immunization of children) नियमित व वेळेवर करणे.
- 29 सप्टेंबर- स्तनपानाबाबत जनजागृती करणे आणि
- 30 सप्टेंबर रोजी सर्व विभागाकडून पोषण अभियान प्रतिज्ञा घेणे व पोषण महिना (National Nutrition Month) समारोप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार
अशी माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसमुना पंत व बाल कल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय जोल्हे यांनी दिली.
Post a Comment