Header Ads

Vijay Bhad got selected from Amravati Division भोपाळ येथील विज्ञान प्रशिक्षणा कार्यशाळेकरीता महाराष्ट्रातील १५ शिक्षकांची निवड : अमरावती विभागातून विजय भड यांची निवड

 

Vijay Bhad Principal Babasaheb Dhabekar Madhyamik Vidyalay Yavardi


भोपाळ येथील विज्ञान प्रशिक्षणा कार्यशाळेकरीता महाराष्ट्रातील 15 शिक्षकांची निवड

अमरावती विभागातून विजय भड यांची निवड

        कारंजा (www.jantaparishad.com) दि १८ - येथून जवळच असलेल्या बाबासाहेब धाबेकर माध्यमिक विद्यालय यावर्डी येथील मुख्याध्यापक  (Principal Babasaheb Dhabekar Madhyamik Vidyalay Yavardi) तथा विज्ञान शिक्षक विजय देविदास भड (Vijay Bhad) यांची निवड क्षेत्रिय शिक्षा संस्थान,भोपाल येथे आयोजित माध्यमिक विज्ञान शिक्षकांच्या उद्बबोधन कार्यशाळेकरीता महाराष्ट्र राज्य शैक्षणिक  संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे, येथिल उपसंचालक विकास गरड यांनी एका पत्राद्वारे केली आहे.

        सदर कार्यशाळेकरीता महाराष्ट्रातील माध्यमिक शाळेत विज्ञान शिकवणाऱ्या पंधरा विज्ञान शिक्षकाची निवड करण्यात आली आहे. अमरावती विभागातून निवड यादि मध्ये विजय भड याचं एकच नाव असल्यामुळे, ते अमरावती विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

         सदर प्रशिक्षण दिनांक 19 ते 23 सप्टेंबर 2022  या कालावधीत क्षेत्रीय शिक्षा संस्थान,भोपाल येथे महाराष्ट्र, मध्य प्रदेश व छत्तीसगड या तीन राज्यातील प्रत्येकी 15 विज्ञान शिक्षकांकरिता आयोजित केलेले आहे.

प्रशिक्षणामध्ये विज्ञान कीटच्या वापराबाबत प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. सदर प्रशिक्षणा साठी  निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.

No comments

Powered by Blogger.