Header Ads

वैयक्तिक शेततळे अस्तरीकरणाचा लाभ घ्यावा vaiyaktik shettale astrikaran yojana 50% subsidy

वैयक्तिक शेततळे अस्तरीकरणाचा लाभ घ्यावा - कृषी विभागाचे आवाहन, 50 टक्के अनुदान  vaiyaktik shettale astrikaran yojana 50% subsidy


वैयक्तिक शेततळे अस्तरीकरणाचा लाभ घ्यावा - कृषी विभागाचे आवाहन

         वाशिम, दि. 05 (जिमाका) : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाअंतर्गत वैयक्तिक शेततळे  हा घटक पाण्याचा साठा निर्माण करणे व साठविलेले पाणी झिरपून वाया जाऊ नये. पाणी टंचाईच्या काळात फळबागा जगविण्यासाठी साठविलेल्या पाण्याचा उपयोग व्हावा या उद्देशाने 50 टक्के अनुदानावर वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण योजना (vaiyaktik shettale astrikaran yojana) राबविण्यात येत आहे. ज्या शेतकऱ्यांनी स्वखर्चाने अथवा विविध शासकीय योजनेतून शेततळे खोदकाम केले आहे, अशा पात्र शेतकऱ्यांना शेततळयाच्या आकारमाननिहाय पुढीलप्रमाणे अनुदान देण्यात येणार आहे.

         वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण या घटकासाठी आकारमाननिहाय देण्यात येणारे अनुदान पुढीलप्रमाणे - 

  • 15X15X3 मीटरसाठी 50 टक्के प्रमाणे अनुदान रक्कम 28 हजार 275 रुपये. 
  • 20X15X3 मीटरसाठी 50 टक्के प्रमाणे अनुदान रक्कम 31 हजार 598 रुपये. 
  • 20X20X3 मीटरसाठी 50 टक्के प्रमाणे अनुदान रक्कम 41 हजार 218 रुपये. 
  • 25X20X3 मीटरसाठी 50 टक्के प्रमाणे अनुदान रक्कम 49 हजार 671 रुपये. 
  • 25X25X3 मीटरसाठी 50 टक्के प्रमाणे अनुदान रक्कम 58 हजार 700 रुपये. 
  • 30X25X3 मीटरसाठी 50 टक्के प्रमाणे अनुदान रक्कम 67 हजार 728 रुपये आणि 
  • 30X30X3 मीटरसाठी 50 टक्के प्रमाणे जास्तीत जास्त देण्यात येणारे अनुदान रक्कम 75 हजार रुपये असेल.

         या योजनेचा लाभ घेण्यासाठी (mahadbt portal website) महाडीबीटी पोर्टल mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर सिंचन सुविधा या घटकासाठी अर्ज करावे. योजनेच्या अधिक माहितीसाठी जवळच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी केले आहे.

No comments

Powered by Blogger.