Header Ads

सामूहिक शेततळयासाठी महाडिबीटी पोर्टलवर अर्ज आमंत्रित Collective Farm pond Applications on MahaDBT portal

Collective Farm pond Applications on MahaDBT portal सामूहिक शेततळयासाठी महाडिबीटी पोर्टलवर अर्ज आमंत्रित


सामूहिक शेततळयासाठी महाडिबीटी पोर्टलवर अर्ज आमंत्रित

Apply for Collective Farm pond Applications on MahaDBT portal 

         वाशिम, दि. 05 (जिमाका) : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत सामूहिक शेततळे (collective farm) हा घटक फलोत्पादन पिकांसाठी संरक्षित सिंचनाची सुविधा निर्माण करणे व दुष्काळी भागामध्ये फलोत्पादन पिकाच्या क्षेत्र विस्तारासाठी सिंचन (Irrigation) सुविधा निर्माण करणे या उद्देशाने 100 टक्के अनुदान (100 percent subsidy) वर राबविण्यात येत आहे. या घटकाचा लाभ घेण्यासाठी शेतकरी समूहाकडे फलोत्पादन पिके असणे आवश्यक आहे. (Collective Farm pond Applications on MahaDBT portal) सामूहिक शेतळयाचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टल mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर सिंचन सुविधा या घटकासाठी अर्ज करावे. 

         सामूहिक शेततळे घटकासाठी आकारमाननिहाय देण्यात येणारे अनुदान- 34X34X4.70 मीटरसाठी फलोत्पादन क्षेत्र 2 हेक्टर ते 5 हेक्टर किंवा त्यापेक्षा जास्त असावे. याकरीता 3 लक्ष 39 हजार रुपये अनुदान. 24X24X4.00 मीटरसाठी फलोत्पादन क्षेत्र 1 हेक्टर ते 2 हेक्टर असणे आवश्यक आहे. याकरीता 1 लक्ष 75 हजार रुपये अनुदान देण्यात येईल. सामूहिक शेतळयाचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टल mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर सिंचन सुविधा या घटकासाठी अर्ज करावे. योजनेच्या अधिक माहितीसाठी जवळच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी केले आहे.

No comments

Powered by Blogger.