Header Ads

विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक/पत्नी/पाल्यांना विशेष गौरव पुरस्कार योजना Special Honors Scheme for Ex-Servicemen/Wives/Children

Special Honors Scheme for Ex-Servicemen/Wives/Children


विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक/पत्नी/पाल्यांना विशेष गौरव पुरस्कार योजना

Special Honors Scheme for Ex-Servicemen/Wives/Children

         वाशिम, दि. 08 (जिमाका) : जिल्ह्यातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या (खेळात/साहित्य, संगीत, गायन, वादन, नृत्य, नाट्य व इतर कला/नैसर्गिक आपत्तीमध्ये बहुमोल कामगिरी/ यशस्वी उद्योजक/सामाजिक कार्य आणि पर्यावरणविषयक पुरस्कार मिळवणारे) माजी सैनिक/पत्नी/पाल्य तसेच शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये इयत्ता १० वी व १२ वी बोर्डात ९० टक्केपेक्षा जास्त गुण मिळविलेल्या तसेच पदवी किंवा पदव्युत्तर परिक्षेत विद्यापीठात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण व आयआयटी, आयआयएम व एम्स अशा नामवंत व ख्यातीप्राप्त संस्थामध्ये प्रवेश मिळालेल्या माजी सैनिक पाल्यांना सैनिक कल्याण विभागाकडून विशेष गौरव पुरस्कार (Special Honors) देण्यात येणार आहे.

           विशेष गौरव पुरस्कार योजने (Special Honors Scheme) साठी पात्र असलेल्या माजी सैनिक/पत्नी व पाल्यांनी सैनिक कल्याण कार्यालयात उपलब्ध असलेल्या कागदपत्रांसाठी २० सप्टेंबर २०२२ पूर्वी संपर्क साधावा. कार्यालयात येतांना ओळखपत्राची छायांकित प्रत, इयत्ता १० वी व १२ वी बोर्डाच्या परीक्षेच्या गुणपत्रीकेची छायांकित प्रत, चालू वर्षी शिकत असल्याचे बोनाफाईड सर्टिफिकेट, डिस्चार्ज पुस्तकात कुटुंबाची नांवे असलेल्या पानाची छायांकित प्रत, आर्थिक मदतीच्या हिरव्या कार्डची छायांकित प्रत, राष्ट्रीयकृत बँक पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत व आधार कार्डची छायांकित प्रत तसेच इतर क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दलचे प्रमाणपत्र आदी कागदपत्रे सोबत आणावी. या योजनेचा जास्तीत जास्त माजी सैनिकांनी लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, वाशिम यांनी केले आहे.

No comments

Powered by Blogger.