११ सप्टेंबरला जिल्हयात मतदार ओळखपत्राला आधार जोडणी शिबीर Aadhaar linking camp to voter ID card in the district on September 11

Aadhaar linking camp to voter ID card


११ सप्टेंबरला जिल्हयात मतदार ओळखपत्राला आधार जोडणी शिबीर

Aadhaar linking camp to voter ID card in the district on September 11

     वाशिम, दि. 08 (जिमाका) : मतदार याद्यांच्या प्रमाणिकरणासाठी व मतदार यादीतील दुबार नावे वगळण्यासाठी निवडणूक आयोगाने मतदार ओळखपत्राला आधार क्रमांक जोडण्याचा कार्यक्रम 1 ऑगस्टपासून हाती घेतला आहे. जिल्हयात 11 सप्टेंबर रोजी 1051 मतदान केंद्रावर व मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयात मतदार ओळखपत्रासोबत आधार क्रमांक जोडण्यासाठी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.  तरी जिल्हयातील मतदारांनी आपल्या मतदार ओळखपत्राला आधार क्रमांक (link voter id card to aadhar card) जोडावा. असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

         नागरीकांनी फॉर्म नंबर 6 (ब) भरुन निवडणूक विभागाव्दारे नियुक्त मतदान केंद्र अधिकारी यांच्याकडे सादर करावा. निवडणूक विभागाकडून व्होटर हेल्पलाईन ॲप  (voter helpline app) विकसीत केले आहे. या ॲपच्या माध्यमातून मतदारांना मतदार ओळखपत्रासोबत आधारकार्ड जोडता येईल. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यासाठी घरोघरी भेट देत आहे. मतदार यादीतील 100 टक्के मतदारांशी संपर्क करुन मतदार यादी आधार क्रमांकाशी जोडण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाने आधार क्रमांकाच्या सुरक्षेबाबत योग्य ती खबरदारी घेतली असल्याने मतदारांनी या सुरक्षेबाबत शंका बाळगू नये असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी संदीप महाजन यांनी कळविले आहे.  

Share on Google Plus

About Janta Parishad

    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

एक टिप्पणी भेजें

साप्ताहिक जनता परिषद अंक - ४३ वर्ष - ४४ दिनांक - २४ नोव्हेंबर २०२२ Janta Parishad E-43 Y-44 24-11-2022

  साप्ताहिक जनता परिषद अंक - ४३     वर्ष - ४४    दिनांक - २४ नोव्हेंबर २०२२    Weekly Janta Parishad    Edition : 43      Year : 44     Date...