Header Ads

१० ऑक्टोबरपर्यंत कलम १४४ चे प्रतिबंधात्मक आदेश - Prohibitory order of Section 144 till October 10


१० ऑक्टोबरपर्यंत कलम १४४ चे प्रतिबंधात्मक आदेश


१० ऑक्टोबरपर्यंत कलम १४४ चे प्रतिबंधात्मक आदेश

       वाशिम, दि. 27 (जिमाका) : 26 सप्टेंबरपासून नवदुर्गा/ नवरात्र उत्सवास सुरुवात झाली आहे. 9 ऑक्टोबर रोजी ईद-ए-मिलाद उत्सव साजरा करण्यात येणार आहे. या काळात एखादया व्यक्तीकडून आक्षेपार्ह संदेश/ व्हिडीओ प्रसारीत झाल्यास विशिष्ट समाजातील/ गटातील कट्टर तरुणांकडून हिंसक घटना घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशाप्रकारचे कृत्य भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 505, 153 अ व 116 नुसार दंडनिय अपराध आहे.

          जिल्हा हा जातीय व राजकीयदृष्टया संवेदनशील आहे. सद्यस्थितीत जातीय सलोखा कायम असून जिल्हयात शांतता आहे. देशातील व राज्यातील सद्यस्थिती तसेच आगामी काळातील सण उत्सव पाहता एखाद्या व्यक्तीकडून आक्षेपार्ह संदेश/व्हिडीओ प्रसारीत झाल्यास जातीय सलोखा आणि कायदा व सुव्यवस्था बाधीत होऊ नये याकरीता तसेच समाज माध्यमाव्दारे आक्षेपार्ह संदेश/ व्हिडीओ प्रसारीत होण्यास अटकाव निर्माण व्हावा याकरीता 10 ऑक्टोबरपर्यंत फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ नुसार प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहे.

         जिल्हयात आक्षेपार्ह संदेश/व्हिडीओ प्रसारीत झाल्यास जातीय सलोखा आणि कायदा व सुव्यवस्था बाधीत होऊ नये याकरीता समाज माध्यमाव्दारे आक्षेपार्ह संदेश/व्हिडीओ प्रसारीत करण्यास मनाई करण्याकरीता फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ नुसार जिल्हादंडाधिकारी षण्मुगराजन एस. प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहे.

No comments

Powered by Blogger.