Header Ads

पावसाचा जोर वाढण्याचा हवामान विभागाचा इशारा - Meteorological Department warns of RAIN-THUNDER

RAIN THUNDER


पावसाचा जोर वाढण्याचा हवामान विभागाचा इशारा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संबंधित जिल्हा प्रशासनाला सावधगिरीच्या सूचना

        मुंबई, दि. 8 : पुढील चार-पाच दिवस हवामान विभागाने राज्यात विशेषतः पश्चिम कोकण आणि उत्तर महाराष्ट्र तसेच विदर्भातही पावसाचा जोर वाढण्याचा इशारा दिला आहे. काही ठिकाणी अतिवृष्टीदेखील होऊ शकते.  त्या संदर्भामध्ये संबंधित जिल्हा प्रशासनाने आपली यंत्रणा सज्ज ठेवावी व कुठलीही आपत्ती आल्यास मदतीसाठी तयार राहावे, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.

        कालही ढगफुटीसदृश पाऊस झाल्याची घटना घडली. महाराष्ट्रासह दक्षिणेकडील राज्यातही जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे आपल्याकडे देखील एनडीआरएफ तसेच इतर बचाव पथकांना सज्ज ठेवावे व यंत्रणांनी एकमेकांमध्ये समन्वय ठेवावा, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

No comments

Powered by Blogger.