Header Ads

महाडीबीटी पोर्टल : शिष्यवृत्ती व योजनांचे अर्ज सादर करा - MahaDBT Portal : Submit applications for scholarships and schemes

महाडीबीटी पोर्टल : शिष्यवृत्ती व योजनांचे अर्ज सादर करा - समाज कल्याण विभागाचे आवाहन


महाडीबीटी पोर्टल : शिष्यवृत्ती व योजनांचे अर्ज सादर करा

समाज कल्याण विभागाचे आवाहन

     वाशिम, दि.२३ (जिमाका) : अनुसूचित जाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्ग या प्रवर्गासाठी राबविण्यात येणाऱ्या मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती/शिक्षण फी, परीक्षा फी योजना व इतर ऑनलाईन योजनांचे शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मधील अर्ज स्विकारण्यासाठी २१ सप्टेंबर २०२२ पासून नवीन प्रवेशित व नूतनीकरणाचे विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्यासाठी महाडिबीटी पोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे.  

        सन २०२२-२३ मधील अनुसूचित जाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती व इतर योजनांचे अर्ज https://mahadbtmahait.gov.in या महाडीबीटी पोर्टलच्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांचे अर्ज भरणेबाबत महाविद्यालय स्तरावरुन विद्यार्थ्यांना व पालकांना कळवावे.  महाविद्यालयांनी सन २०२२-२३ करीता अनुसूचित जाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती व इतर योजनांचे अर्ज महाडिबीटी प्रणालीवर जास्त प्रमाणात नोंदणीकृत होतील याकडे लक्ष द्यावे.

         जिल्हयातील सर्व महाविद्यालयातील प्राचार्यांनी आपल्यास्तरावरुन सर्व संबंधित पात्र विद्यार्थ्यांना महाडीबीटी पोर्टलवर अर्ज भरण्यास कळवावे. तसेच महाडीबीटी पोर्टल https:/dbtworkflow.mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर संबंधित महाविद्यालयांनी मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा फी (फ्रीशिप) योजना व इतर ऑनलाईन झालेल्या सर्व योजनांच्या विद्यार्थ्यांचे अर्ज शासन निर्णयानुसार पडताळणी करून पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, वाशिम यांच्याकडे तात्काळ ऑनलाईन पाठवावे. पात्र विद्यार्थी वरील योजनांपासून वंचित राहिल्यास आणि अशा विद्यार्थ्यांकडून शासन अनुज्ञेय शुल्क वसूल केल्यास संबंधित महाविद्यालय शासन निर्णयानुसार कारवाईस पात्र राहील. याची नोंद घ्यावी. असे समाज कल्याणचे सहायक आयुक्त, एम. जी. वाठ यांनी कळविले आहे.

No comments

Powered by Blogger.