Header Ads

जेसीआय वाशीम च्या कॉफी विथ टायकुन कार्यक्रमाला भव्य प्रतिसाद - JCI Washim Coffee with Tycoon program

JCI Washim Coffee with Tycoon program : जेसीआय वाशीम च्या कॉफी विथ टायकुन कार्यक्रमाला भव्य प्रतिसाद


जेसीआय वाशीम कॉफी विथ टायकुन कार्यक्रमाला भव्य प्रतिसाद

JCI Washim's Coffee with Tycoon program 

यशस्वी होण्यासाठी जिद्द, चिकाटी,परिश्रमाची गरज : मनिष तोष्णीवाल

        वाशीम www.jantaparishad.com दि १६ : यशस्वीं होण्यासाठी जिद्द, चिकाटी  व परिश्रमाची गरज आहे.  आपण ज्या व्यवसायामध्ये कार्यरत आहो त्यामध्ये जर आपल्याला पुढे जावयाचे असल्यास त्यासाठी नियम बनविणे जरूरी आहे.  व्यवसायामध्ये नाते  संबंध हे दूर ठेवावे लागतात तेव्हा व्यक्ती यशस्वी भरारी घेवू शकतो. नौकरी करतांना आपण केवळ आपल्या परिवारापुरते मर्यादीत राहतो. मात्र व्यवसायाच्या माध्यमातून व्यक्ती हा परिवारासोबत अनेकांना रोजगार उपलब्ध करून देत असतो.  कोणी परिवर्तन करेल, पुढाकार घेईल ह्या भावना दूर ठेवून आपणच परिवर्तनाची कास धरावी. सुरूवात स्वत:पासून करावी असे आवाहन यशस्वी उद्योजक (Successful entrepreneur) शिव इंडस्ट्रीजचे संचालक मनिष तोष्णीवाल (Manish Toshniwal, Director Shiv Industries) यांनी केले.

  स्थानिक केमिस्ट भवन येथे जेसीआय वाशिम सिटी (JCI Washim City) च्या वतीने बुधवार 14 सप्टेंबर रोजी कॉफी विथ बिझनेस टायकुन (Coffee with Business Tycoon) या कार्यक्रमामध्ये त्यांनी वरील प्रतिपादन केले.  यावेळी मनिष तोष्णवाल यांनी आपली सुरूवात  नौकरीपासून झाली होती. मात्र त्यानंतर आपण व्यवसायाकडे कसे वळलो त्यात आलेल्या अडचणी व त्यावर केलेली मात याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. वाशीम जिल्हयामध्ये इंडस्ट्रीज विकासाकरीता मोठी चालना मिळू शकते. एमआयडीसीमध्ये मोठे प्रकल्प उभारल्या जावू शकते. मात्र त्यासाठी लोकप्रतिनिधी यांची मानसिकता परिवर्तन करणे गरजेचे आहे.  कुठलीही गोष्ट अशक्य नाही. यश आपल्या हातात आहे.  प्रत्येकाने आपल्या व्यवसायाप्रति निष्ठा ठेवून कार्य केल्यास प्रगती शक्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी जेसीआय वाशीम सिटीचे अध्यक्ष अ‍ॅड. राजेश कासटे (JCI Washim City President Adv. Rajesh Caste), इंजि. पंकज बाजड (Engr. Pankaj Bajad) यांनी तोष्णीवाल यांच्याशी संवाद साधला. उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे तोष्णीवाल यांनी देवून त्यांचे समाधान केले. उपस्थितांमध्ये डॉ. कैलास दागडीया व भावसार यांनी आपले मनोगत व्यक्त करून जेसीआयने अत्यंत स्तुत्य उपक्रम घेतल्याचे सांगीतले. सदर कार्यक्रमाचे संचालन पंकज बाजड तर आभार सागर दायमा यांनी मानले.  

    कार्यक्रमामध्ये जेसीआय (JCI), लॉयन्स क्लब (Lions Club), माहेश्वरी संघटना, पदाधिकारी , युवा व्यवसायीक व विविध संघटनेचे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते. जेसीआयच्या वतीने पुरूषोत्तम परताणी यांच्याहस्ते उद्योजक मनिष तोष्णीवाल यांचा सन्मान चिन्ह देवून सत्कार करण्यात आला. राष्ट्रगिताने कार्यक्रमाचीं सांगता करण्यात आली.  

No comments

Powered by Blogger.