Header Ads

स्वा. से. श्री. क. रा. इन्नाणी महाविद्यालयात CBCS & NEP या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन - One Day Workshop Organized in SSSKR Innani College Karanja on CBCS & NEP

SSSKR Innani College Karanja lad district washim - SSSKR इन्नाणी कॉलेज कारंजा लाड जिल्हा वाशीम


स्वा. से. श्री. क. रा. इन्नाणी महाविद्यालयात CBCS & NEP या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन

One Day Workshop on CBCS & NEP Organized in SSSKR Innani College Karanja

        कारंजा (www.jantaparishad.com) दि १६ - स्थानिक कारंजा लाड येथील स्वा. से. श्री. क. रा. इन्नाणी महाविद्यालयात नविन शैक्षणिक धोरण २०२० ची अंमलबजावणी म्हणून संत गाडगे बाबा अमरावती विद्यापिठाचे कुलगुरू मा. डॉ. दिलीप मालखेडे यांनी पसंतीवर आधारित श्रेयांक पध्दती ( CBCS Pattern) सुरू करण्याचे आदेश २०२१ - २३ ह्या सत्रा पासुन दिले आहेत. त्यानुसार प्राध्यापक, प्राचार्य, विद्यार्थी यांना ( CBCS) बद्दल अद्यावत माहिती मिळणे आवश्यक आहे. करिता स्वा. से. श्री. क. रा. इन्नाणी महाविद्यालय, कारंजा लाड ( SSSKR Innani College Karanja lad District Washim) येथे पसंतीवर आधारित श्रेयांक पध्दती (CBCS) या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे दिनांक १७ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ९.०० ते ६.०० वाजे पर्यंत आयोजन करण्यात येत आहे. 

स्वा. से. श्री. क. रा. इन्नाणी महाविद्यालयात CBCS & NEP या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन One Day Workshop on CBCS & NEP Organized in SSSKR Innani College Karanja

        या कार्यशाळेत स्वा. से. श्री. क. रा. इन्नाणी महाविद्यालय, कारंजा लाड, श्री. किसनलाल गोयनका कला व वाणिज्य महाविद्यालय, कारंजा लाड, श्रीमती शकुंतलाबाई धाबेकर महाविद्यालय, कारंजा लाड, रामराव झनक कला व वाणिज्य महाविद्यालय, मालेगाव, स्व. पुंडलीकराव गवळी कला व विज्ञान महाविद्यालय, शिरपूर जैन, आदर्श बी. एड. महाविद्यालय, कारंजा लाड येथील एकूण ११३ शिक्षक सहभागी होणार आहेत. वरिल महाविद्यालयाचे आजी व माजी प्राचार्य, शिक्षक, तासिका तत्वावर शिकवणारे शिक्षक महाविद्यालय व्यवस्थापनाचे प्रतिनिधीं इत्यादी सर्व घटकांना याचा लाभ होणार आहे. उपरोक्त कार्यशाळेचे जबाबदारी विद्याभारती शैक्षणिक मंडळ, अमरावती द्वारा संचालीत स्वा. से. श्री. क. रा. इन्नाणी महाविद्यालय, कारंजा लाड चे प्राचार्य डॉ. ए. एन. देवरे व त्यांच्या चमूवर देण्यात आली असून ते कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनाची तयारी करीत आहेत. त्यानंतर कार्यशाळेमध्ये मुख्य उद्घाटन सत्राचे आभासी प्रक्षेपण करण्यात येणार असून,

        कार्यक्रमाचे उद्घाटन साठी अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्री. ए. एन. देवरे हे असून उद्घाटक महाविद्यालयाचे स्थानीय व्यवस्थापन समितीचे मा. सदस्य श्री. शेखरजी बंग, तर प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. प्रकाशजी गोलेच्छा हे उपस्थित राहणार आहेत. त्यामध्ये मा. प्र. कुलगुरू डॉ. विजयकुमार चौबे यांचे स्वागतपर मनोगत आणि प्रास्ताविक होणार आहे. तसेच उद्घाटक म्हणून मा. ना. श्री. देवेन्द्रजी फडणवीस, मा. उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे संबोधन होणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून मा. ना. श्री. चंद्रकांतदादा पाटील, मा. मंत्री महोदय उच्च व तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य संबोधतीन करतील विशेष अतिथी म्हणून मा. श्री. विकास चंद्र रस्तोगी मा प्रधान सचिव, उच्च व तंत्रशिक्षण विभाग म. रा. मा. ना. श्री. नितीनजी गडकरी, मा. केंद्रीयमंत्री, रस्ने, वाहतूक व राज्यमार्ग, नवी दिल्ली, महामहिम राज्यपाल तथा बलपती मा. श्री. भगतसिंहजी कोश्यारी, राजभवन म. रा. मा. ना. श्री. नरेद्रजी मोदी मा. पंतप्रधान, नवी दिल्ली, मा. प्रा. डॉ. अनिल सहस्त्रबुध्दे मा. अध्यक्ष अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण परिषद, नवी दिल्ली यांचे संबोधन होणार आहे. अभासी कार्यक्रमाचे अध्यक्षीय संबोधन डॉ. दिलीप मालखेडे, मा. कुलगुरू तर आभार प्रदर्शन डॉ. तुषार देशमुख, मा. कुलसचिव करणार आहेत.


        या कार्यशाळेसाठी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती यांच्या वतीने प्रा. डॉ. अंजली बोदाडे, श्री. शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावती यांची तज्ञ प्रशिक्षक व मार्गदर्शक म्हणून नियुक्ती केलेली आहे. त्यांचे मार्गदर्शन दुसर्या  सत्रात लाभणार आहे. त्याचप्रमाणे समारोपीय सत्रासाठी मा. श्रीमती उर्मीलाताई ठाकुर स्थानिय व्यवस्थापन समिती सदस्य व श्री मनोहर राऊत महाविद्यालय विकास समिती सदस्य उपस्थित राहणार आहेत. तेव्हा संबंधीत महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व व्यवस्थापन प्रतिनिधी तसेच इतर शिक्षणाबद्दल रूची असणाऱ्या इच्छूक व्यक्तींनी उपरोक्त कार्यशाळेचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. रावसाहेब शेखावत सचिव डॉ. अशोक चव्हाण महाविद्यालयाचे स्थानीय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. एन. देवरे, प्राध्यापक व समस्त विद्याभारती परिवार कारंजा लाड यांनी केले आहे.

No comments

Powered by Blogger.