Header Ads

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान - काढणीत्तोर व्यवस्थापन घटकांतर्गत मिळणार अर्थसहाय्य - Integrated Horticulture Development Mission - ekatmik falotpadan vikas abhiyan

Integrated Horticulture Development Mission - एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान - ekatmik falotpadan vikas abhiyan


एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान

Integrated Horticulture Development Mission - ekatmik falotpadan vikas abhiyan

काढणीत्तोर व्यवस्थापन घटकांतर्गत मिळणार अर्थसहाय्य

       वाशिम, दि. 28 www.jantaparishad.com (जिमाका) : फलोत्पादन पिकांचे मुल्यवर्धन/प्रक्रीया करून शीतगृहांमध्ये साठवणूक करून फलोत्पादन पिके/ त्यांचे पदार्थ वर्षभर सर्व हंगामात उपलब्ध होऊ शकतात, ही बाब लक्षात घेऊन एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत (Integrated Horticulture Development Mission - ekatmik falotpadan vikas abhiyan) काढणीत्तोर व्यवस्थापन घटकाअंतर्गत एकात्मिक पॅक हाऊस (Ekatmik Pack House), पुर्व शीतकरण गृह (Pre-chilling house), शीतखोली ( cold storage), शीतगृह (cold storage), शीतवाहन (cold transport), रायपनिंग चेंबर (ripening chamber) व एकात्मिक शीतसाखळी प्रकल्पांची (integrated cold chain projects) उभारणीसाठी शासनाकडून अर्थसहाय्य करण्यात येणार आहे.

          उत्पादित फलोत्पादन, औषधी, सुगंधी माचाली साफसफाई, प्रतवारी व पॅकिंग करून दर्जा कायम ठेवून साठवणूक कालावधी वाढविणे तसेच मोठया प्रमाणावर फलोत्पादन पिकांच्या मालाची आवक वाढवून बाजार मूल्य शेतकऱ्यांना कमी मिळते या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी एकात्मिक पॅक हाऊस, पुर्व शीतकरण गृह, शीतखोली, शीतगृह, शीतवाहन, रायपनिंग चेंबर व एकात्मिक शीतसाखळी आदी प्रकल्पांना प्रोत्साहन व अर्थसहाय्य देण्यात येते.

         काढणीपश्चात व्यवस्थापन घटकांतर्गत आकारमाननिहाय देण्यात येणारे अनुदान पुढीलप्रमाणे आहे. पॅक हाऊस ४ लक्ष रुपये अधिकतम ग्राहय प्रकल्प रक्कम बांधकाम क्षेत्र/क्षमता ९ मीटर X ६ मीटर देण्यात येणारे अनुदान ग्राहय भांडवली खर्चाच्या सर्वसाधारण/डोंगराळ व अधिसूचित क्षेत्रासाठी ५० टक्के २ लक्ष रुपये. एकात्मिक पॅक हाऊस कन्वेअर बेल्ट, संकलन व प्रतवारी केंद्र, वॉशिंग व ड्राईग यार्ड आणि भारत्तोल इत्यादी सुविधांसह अधिकतम ग्राहय प्रकल्प रक्कम ५० लक्ष रुपये तसेच बांधकाम क्षेत्र/ क्षमता ९ मीटर X १८ मीटर देण्यात येणारे अनुदान ग्राहय भांडवली खर्चाच्या सर्वसाधारणसाठी ३५ टक्के १७ लक्ष ५० हजार रुपये व डोंगराळ व अधिसूचित क्षेत्रासाठी ५० टक्के २५ लक्ष रुपये. पुर्व शितकरण गृह अधिकतम ग्राहय प्रकल्प रक्कम २५ लक्ष रुपये प्रति यूनिट देण्यात येणारे अनुदान ग्राहय भांडवली खर्चाच्या सर्वसाधारणसाठी ३५ टक्के ८ लक्ष ७५ हजार रुपये व डोंगराळ व अधिसुचित क्षेत्रासाठी ५० टक्के १२ लक्ष ५० हजार रुपये. शितखोली (स्टेजिंग) अधिकतम ग्राहय प्रकल्प रक्कम १५ लक्ष प्रति युनिट देण्यात येणारे अनुदान ग्राहय भांडवली खर्चाच्या सर्वसाधारणसाठी ३५ टक्के ५ लक्ष २५ हजार रुपये व डोंगराळ व अधिसुचित क्षेत्रासाठी ५० टक्के ७ लक्ष ५० हजार रुपये. नविन तंत्रज्ञान राबविणे व शितसाखळी आधुनिकीकरण अधिकतम ग्राहय प्रकल्प रक्कम २ कोटी ५० लक्ष रुपये देण्यात येणारे अनुदान ग्राहय भांडवली खर्चाच्या सर्वसाधारणसाठी ३५ टक्के ८७ लक्ष ५० हजार रुपये व डोंगराळ व अधिसूचित क्षेत्रासाठी ५० टक्के रक्कम १ कोटी २५ लक्ष रुपये.

          शितवाहन अधिकतम ग्राहय प्रकल्प रक्कम २६ लक्ष रुपये तसेच बांधकाम क्षेत्र/क्षमता ९ मेट्रीक टन देण्यात येणारे अनुदान ग्राहय भांडवली खर्चाच्या सर्वसाधारणसाठी ३५ टक्के ९ लक्ष १० हजार रुपये व डोंगराळ व अधिसूचित क्षेत्रासाठी ५० टक्के १३ लक्ष रुपये. रायपनिंग चेंबर अधिकतम ग्राहय प्रकल्प रक्कम १ लक्ष रुपये प्रति मेट्रीक टन तसेच बांधकाम क्षेत्र/क्षमता ३०० मेट्रीक टन, देण्यात येणारे अनुदान ग्राहय भांडवली खर्चाच्या सर्वसाधारणसाठी ३५ टक्के व डोंगराळ व अधिसूचित क्षेत्रासाठी ५० टक्के.

         नविन शितगृह युनिट प्रकार-१ एकसारख्या तापमानात राहणाऱ्या उत्पादनासाठी प्रति चेंबर २५० टन, अधिकतम ग्राहय प्रकल्प रक्कम ८ हजार रुपये प्रति मेट्रीक टन तसेच बांधकाम क्षेत्र/क्षमता ५ हजार मेट्रीक टन प्रति लाभार्थी, देण्यात येणारे अनुदान (ग्राहय भांडवली खर्चाच्या ) सर्वसाधारणसाठी ३५ टक्के जास्तीत जास्त १ कोटी ४० लक्ष रुपये, डोंगराळ व अधिसूचित क्षेत्रासाठी ५० टक्के जास्तीत जास्त २ कोटी रुपये. शितगृह युनिट प्रकार-२ एकापेक्षा अधिक उत्पादने व तापमानासाठी कमीत कमी ६ चेंबर्सपेक्षा जास्त प्रति चेंबर २५० टन, अधिकतम ग्राहय प्रकल्प रक्कम १० हजार प्रति मेट्रीक टन तसेच बांधकाम क्षेत्र/क्षमता ५ हजार मेट्रीक टन प्रति लाभार्थी, देण्यात येणारे अनुदान ग्राहय भांडवली खर्चाच्या सर्वसाधारणसाठी ३५ टक्के जास्तीत जास्त १ कोटी ७५ लक्ष रुपये, डोंगराळ व अधिसूचित क्षेत्रासाठी ५० टक्के जास्तीत जास्त २ कोटी ५० लक्ष रुपये देण्यात येईल.

         शितगृह युनिट प्रकार-२ (नियंत्रण वातावरणासाठी नविन तंत्रज्ञान राबविणे) अधिकतम ग्राहय प्रकल्प रक्कम १० हजार प्रति मेट्रीक टन तसेच बांधकाम क्षेत्र/क्षमता ५ हजार मेट्रीक टन प्रति लाभार्थी, देण्यात येणारे अनुदान ग्राहय भांडवली खर्चाच्या सर्वसाधारणसाठी ३५ टक्के जास्तीत जास्त १ कोटी ७५ लक्ष रुपये व डोंगराळ व अधिसूचित क्षेत्रासाठी ५० टक्के जास्तीत जास्त २ कोटी ५० लक्ष रुपये देण्यात येईल.

         एकात्मिक शीतसाखळी कार्यपध्दती अधिकतम ग्राहय प्रकल्प रक्कम ६ कोटी रुपये तसेच बांधकाम क्षेत्र/ क्षमता प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी वरील घटकातील किमान २ घटकांचा समावेश असणे आवश्यक आहे. देण्यात येणारे अनुदान ग्राहय भांडवली खर्चाच्या सर्वसाधारणसाठी ३५ टक्के जास्तीत जास्त २ कोटी १० लक्ष  रुपये व डोंगराळ व अधिसुचित क्षेत्रासाठी ५० टक्के 3 कोटी लक्ष रुपये अनुदान उपलब्ध होणार आहे.

         तरी जिल्हयातील शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते की,  त्यांनी या घटकाचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टल MahaDBT Portal mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर (WebSite) सिंचन सुविधा या घटकाखाली अर्ज करावेत. योजनेच्या अधिक माहितीसाठी जवळच्या कृषि कार्यालयाशी संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, वाशिम यांनी केले आहे.    

-------------------------------------------------------

<------- Read This Also  ------->

फळे, फुले, मसाला पीक लागवड व जुन्या फळबागांचे होणार पुनरुज्जीवन

No comments

Powered by Blogger.