Header Ads

कृषी मंत्री अब्दुल सत्तार 23 सप्टेंबरला वाशिम जिल्हयात : Agriculture Minister Abdul Sattar in Washim district on September 23

Agriculture Minister Abdul Sattar in Washim district on September 23


कृषी मंत्री अब्दुल सत्तार 23 सप्टेंबरला वाशिम जिल्हयात

        वाशिम, दि. 22 www.jantaparishad.com (जिमाका) - कृषी मंत्री अब्दुल सत्तार (Agriculture Minister Abdul Sattar) हे 23 सप्टेंबर रोजी वाशिम जिल्हया (Washim district) च्या दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे. 

    सकाळी 9 वाजता औरंगाबाद जिल्हयातील सिल्लोड येथून मोटारीने वाशिम जिल्हयातील मालेगांवकडे प्रयाण.         सकाळी 11 वाजता मालेगांव येथे आगमन व फार्मर प्रोड्युसर कंपनीमार्फतच्या शेतबांधावरील प्रयोगशाळेला भेट.     दुपारी 12 वाजता मंगरुळपीर येथे हिंदू गर्व गर्जना शिवसेना संपर्क मेळाव्याला उपस्थित राहून मार्गदर्शन करतील. 

        दुपारी 2 वाजता वाशिम येथील विठ्ठलवाडी सभागृहात आयोजित हिंदू गर्व गर्जना शिवसेना संपर्क मेळाव्याला उपस्थित राहून मार्गदर्शन करतील. 

    दुपारी 4 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील काटा रोडवर बांधण्यात येत असलेल्या स्व. बाळासाहेब ठाकरे कृषी संकुलाची पाहणी करतील. 

    दुपारी 4.30 वाजता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय येथे स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना लाभार्थ्यांच्या वारसांना श्री. सत्तार यांच्या हस्ते अनुदानाचे वाटप करण्यात येईल. 

    सोईनुसार ते परभणीकडे प्रयाण करतील.   

No comments

Powered by Blogger.