यशवंतराव चव्हाण सैनिक शाळेत राष्ट्रीय ध्वजाला व वृक्षाला राखी बांधून अनोखे रक्षाबंधन साजरे - Yashwantrao Chavan Sainik School, Supkehla celebrated Unique Raksha Bandhan
यशवंतराव चव्हाण सैनिक शाळेत अनोखे रक्षाबंधन
राष्ट्रध्वजाला व वृक्षाला राखी बांधून साजरा केले रक्षाबंधन
वाशिम दि ११ - राखी पौर्णिमा हा सण राज्यभरात राज्यभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी बहीण भावांना प्रेमाचे प्रतीक म्हणून राख्या बांधतात व भावाने बहिणीचे रक्षण करावे तसेच त्यांच्या प्रिय भावास दीर्घायुष्य लाभावे अशी प्रार्थना केली जाते. नेमका हा संदेश वापरून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे व राष्ट्रीय एकात्मतेची महत्त्व पटवून सांगत यशवंतराव चव्हाण सैनिक शाळा सूपखेला (Yashwantrao Chavan Sainik School, Supkehla) येथे राष्ट्रध्वजाला व वृक्षाला राखी बांधून अनोखे रक्षाबंधन (celebrated Unique Raksha Bandhan) साजरे केले गेले.
यावेळी राष्ट्रीय हरित सेनेचे एम एन वानखडे सर यांनी आपल्या प्रास्ताविक पर भाषणामध्ये वृक्ष संवर्धनाचे महत्त्व विशद केले. विद्यार्थी वरद महाकाळ ईशांत राजगुरे आयुष काळे यांनी आपल्या भाषणातून रक्षाबंधनाचा इतिहास व वृक्षांना रक्षाबंधनाचे महत्त्व सांगितले तर रोहित वदे व रोहन लोखंडे या विद्यार्थ्यांनी आपल्या गीतातून राष्ट्रीय ध्वज व राष्ट्रीय एकात्मता विषयी महत्व व्यक्त केले.
आपल्या अध्यक्षीय भाषणातून शाळेचे प्राचार्य श्री एम एस भोयर यांनी वृक्षाचे महत्व विशद करताना सांगितले की," राष्ट्रीय ध्वज हा राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहे. राष्ट्रध्वजाला जेव्हा आपण ही राखी बांधली म्हणजे आपण जणू राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेतली आहे. प्रत्येक बहिणीने आपल्या भावाच्या सुखी आयुष्यासाठी एक वृक्ष लावावे, तर भावाने सुद्धा बहिणीचे रक्षण करण्याचे वचन दे एका वृक्षाची लागवड करावी म्हणजे हे नाते अनमोल बनेल.
यावेळी मंचावर शाळेचे प्राचार्य श्री एम एस भोयर, कमांडंट कर्नल पी.पी.ठाकरे,श्री एस. बी. चव्हाण, श्री एस एस मोळके, कू. व्ही एस वाजपेयी तर विद्यार्थ्यांचे पालक प्रतिनिधी म्हणून श्री विष्णूजी डोईफोडे, श्री रघुजी पडवळ, सौ.शोभा आंबेरे, सौ. सीमा तराळे हे उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्ग 9 वा अ मधील विद्यार्थी चेतन पाटील,प्रज्वल इंगळे तर आभार संस्कार सांगळे यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी प्रशिक्षण निदेशक बीडी सोनटक्के, श्री ए आर खांदवे, निसर्ग मंडळाचे प्रमुख श्री पी ए पाचकोर,एन के भेंडे, व्ही व्ही सिसट श्री एस बी पांडे तसेच सर्व शिक्षकवृंद यांनी परिश्रम घेतले. असे वृत्तांकन श्री आर.आर.पडवळ यांनी कळविले
Post a Comment