Header Ads

संगीता बर्वे यांना ‘पियूची वही’ कादंबरीसाठी साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार - Sangeeta Barve's Piyuchi Vahi got Sahitya Akademi Children's Literature Award

Sangeeta Barve's Piyuchi Vahi


साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कारांची घोषणा

संगीता बर्वे यांना ‘पियूची वही’ कादंबरीसाठी साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार

Sahitya Akademi Children's Literature Award for Sangeeta Barve for her novel 'Piyuchi Vahi' 

नवी दिल्ली, दि. 24  : प्रसिद्ध लेखिका संगीता बर्वे  यांना ‘पियूची  वही’ (Sangeeta Barve Piyuchi Vahi) या कादंबरीकरिता मराठी भाषेसाठीचा ‘साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार’ (Sahitya akadami bal sahitya purskar) जाहीर झाला आहे.

देशातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च संस्था म्हणून नावलौकिक असणाऱ्या साहित्य अकादमीने वर्ष 2022 च्या बाल साहित्य पुरस्कारांची (Children's Literature Award ) घोषणा केली. साहित्य अकादमीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर कंबार (Sahitya Akademi President Dr. Chandrasekhar Kambar) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत देशातील २२ प्रादेशिक भाषांसाठी साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कारांची  निवड व घोषणा करण्यात आली.

Sangeeta Barve


संगीता बर्वे यांच्या लेखनकार्याविषयी

Information About Sangeeta Barve's writings 

व्यवसायाने डॉक्टर असलेल्या डॉ. संगीता बर्वे (Sangeeta Barve) या उत्तम कवयित्री आणि बाललेखिका आहेत. ‘मृगतृष्णा’ (Mrigtrishna) आणि ‘दिवसाच्या वाटेवरून’ (Divsachya Vatevarun) हे त्यांचे कवितासंग्रह  (Kavita sangrah) प्रसिद्ध आहेत. श्रीमती बर्वे यांची बाल लेखिका म्हणूनही वेगळी ओळख आहे. ‘गंमत झाली भारी’(Gammat zali bhari), ‘झाडआजोबा’ (zaad aajoba), ‘खारुताई आणि सावली’ (Kharutai aani sawali), ‘उजेडाचा गाव’ (Ujedacha gav) हे त्यांचे मुलांसाठीचे कवितासंग्रह असून ‘पियूची वही’ (Piyuchi Wahi) ही कांदबरी विशेष प्रसिद्ध आहे. याच कादंबरीवर आधारित ‘संगीत पियूची वही’ हे बाल नाट्यही त्यांनी लिहिले आहे. ‘अदितीची साहसी सफर’ (Aditichi sahasi safar) या पुस्तकाचा त्यांनी अनुवाद केला आहे. यासोबतच, त्यांनी विविध विषयांवर ललित लेखनही केले आहे.

श्रीमती बर्वे यांच्या कवितासंग्रहांना महाराष्ट्र शासनाचा कविवर्य भा.रा.तांबे पुरस्कार, इंदिरा संत  योजनेंतर्गत उत्कृष्ट वाचन निर्मिती पुरस्कार, विशाखा पुरस्कार, कामगार साहित्य परिषदेचा ग.दि.माडगूळकर पुरस्कार, अनन्वय पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

‘पियूची वही’  विषयी

Information about Piyuchi Wahi 

रोजनिशी  लिहिण्यासाठी रोज काहीतरी लिहिण्यासारखे केले पाहिजे या प्रेरणेतून पीयू नावाच्या मुलीला निसर्गातील वेगवेगळ्या गोष्टींची होणारी ओळख हे ‘पियूची वही’  (Piyuchi Wahi) या कादंबरीचा विषय आहे. पीयू नावाची एक छोटी मुलगी  रोजनिशी लिहिण्यासाठी काहीतरी केले पाहिजे म्हणून सुट्टीच्या दिवशी खिडकी रंगवायला घेते. त्यातून तिला तिचे जग आणि निसर्ग सापडतो. निसर्ग आणि निसर्गातील विविध घटकांच्या ओढीने पीयू आपले अनुभव लिहू लागली.

परिक्षक मंडळ व पारितोषिकाविषयी

भारत सासणे, प्रवीण बांदेकर आणि प्रेमानंद गज्वी या साहित्यिकांचा मराठी भाषेतील साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार निवडीच्या परिक्षक मंडळात समावेश होता. 50 हजार रुपये आणि ताम्रपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असून यावर्षी १४ नोव्हेंबर २०२२ या बालदिनी साहित्य अकादमीच्या विशेष कार्यक्रमात या पुस्काराचे वितरण करण्यात येईल.

या पुरस्कारांमध्ये कोकणी  भाषेसाठी लेखिका ज्योती कुंकळकर यांच्या ‘मयुरी’ या कादंबरीस बाल साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे.

No comments

Powered by Blogger.