Header Ads

वाशिम जिल्हयात १० ते २४ ऑगस्ट पर्यंत कलम ३७ (१) (३) चे प्रतिबंधात्मक आदेश - prohibitive order in washim district

washim district map


वाशिम जिल्हयात १० ते २४ ऑगस्ट पर्यंत कलम ३७ (१) (३) चे प्रतिबंधात्मक आदेश

    वाशिम, दि. 08 www.jantaparishad.com (जिमाका) : जिल्ह्यात मोहरम सणानिमित्ताने सवारी, ताजीये, डोले, पंजे इत्यादीची स्थापना होणार आहे. 8 ते 11 ऑगस्ट दरम्यान मोहरम विसर्जन मिरवणूक निघणार आहे. 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाचा वर्धापण दिन साजरा करण्यात येणार आहे. 18 व 19 ऑगस्ट रोजी जिल्हयात सर्वत्र श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीचा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. 

    सद्यस्थितीत जैन धर्मियांचे आचार्य श्री. विद्यासागर महाराज शिरपूर (जैन) येथे चातुर्मास निमित्त वास्तव्यास आहे. शिरपूर (जैन) येथे चातुर्मासाच्या काळात विविध धार्मीक कार्यक्रम व प्रवचनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. 

    या सर्व बाबींचा विचार करता जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे सोयीचे व्हावे. यासाठी 10 ऑगस्टपासून ते 24 ऑगस्टपर्यंत मुंबई पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) चे प्रतिबंधात्मक आदेश (prohibitive order in washim district) जिल्हादंडाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिले आहे. 

    हे आदेश कामावरील कोणतेही पोलीस अधिकारी किंवा इतर शासकीय/निमशासकीय अधिकारी- कर्मचारी किंवा विवाह, अंत्ययात्रा तसेच सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणूकीस व कार्यक्रमास लागू राहणार नाही.

No comments

Powered by Blogger.