महाराष्ट्रातील तीन शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार National Teacher Award 2022 to three teachers from Maharashtra
महाराष्ट्रातील तीन शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार
५ सप्टेंबर रोजी राष्ट्रपतींच्या हस्ते होणार पुरस्कार प्रदान
नवी दिल्ली, दि. 29 : महाराष्ट्रातील तीन शिक्षकांना अध्यापन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी वर्ष २०२२ चे राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार (National Teacher Award 2022) जाहीर झाले आहेत. येत्या ५ सप्टेंबर रोजी शिक्षकदिनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येतील.
01) बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्याच्या दामु नाईक तांडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक शशिकांत कुलथे ( Mr. Shashikant Kulthe ZP Primary School, Damu Naik Tanda, Taluka- Gevrai, District- Beed)
02) बीड जिल्ह्यातील पारगाव जोगेश्वरी येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचे शिक्षक सोमनाथ बाळके (Teacher Mr.Somnath Balke, ZP Central Primary School, Pargaon Jogeshwari, District - Beed)
03) मुंबईतील छत्रभूज नरसी मेमोरियल स्कूलच्या मुख्याध्यापक कविता संघवी (Kavita Sanghvi, principal of Chatrabhuj Narsi Memorial School, Mumbai)
यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाले आहेत.
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने नुकतेच राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारां वर्ष २०२२ (National Teacher Award 2022) ची घोषणा केली आहे. देशातील एकूण ४६ शिक्षकांना हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला असून महाराष्ट्रातील तीन शिक्षकांचा यात समावेश आहे. येत्या ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन (Teacher's Day - 5th September) च्या औचित्याने येथील विज्ञान भवनात राष्ट्रपतींच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
Post a Comment