Header Ads

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार - १८ मंत्र्यांचा समावेश maharashtra mantrimandal vistar 18 new minister

maharashtra mantrimandal vistar


राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार - १८ मंत्र्यांचा समावेश 

        मुंबई, दि. 9 : राज्य मंत्रिमंडळाचा (maharashtra mantrimandal vistar) आज विस्तार करण्यात आला. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी 18 नवनियुक्त मंत्र्यांना (18 new minister) पद व गोपनीयतेची शपथ दिली. राजभवनातील दरबार हॉल येथे शपथविधी समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadanvis) उपस्थित होते.

        या समारंभास विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार, राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, प्रधान सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनिषा म्हैसकर उपस्थित होते.

        शपथविधी सोहळ्यास सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास प्रारंभ झाला. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी New Ministers सर्वश्री राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrishna Vikhe-Patil), सुधीर मुनगंटीवार(Sudhir Mungantiwar), चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), डॉ.विजयकुमार गावित (Dr. Vijaykumar Gavit), गिरीष महाजन (Girish Mahajan), गुलाबराव पाटील (Gulabrao Patil), दादाजी भुसे (Dadaji Bhuse), संजय राठोड (Sanjay Rathod), सुरेश खाडे (Suresh Khade), संदीपान भुमरे (Sandeepan Bhumre), उदय सामंत (Uday Samant), प्रा.तानाजी सावंत (Tanaji Sawant), रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan), अब्दुल सत्तार (Abdul Sattar), दीपक केसरकर (Deepak Kesarkar), अतुल सावे (Atul Sawe), शंभूराज देसाई (Shambhuraj Desai), मंगलप्रभात लोढा (Mangalprabhat Lodha) यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली.

        राष्ट्रगीताने शपथविधी सोहळ्याची सुरुवात आणि सांगता झाली. या सोहळ्याला नवनियुक्त मंत्र्यांचे कुटुंबीय, लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी आदी उपस्थित होते.

No comments

Powered by Blogger.