फौजदार व त्यापेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्यांना विशेष अधिकार प्रदान जिल्हा पोलीस अधिक्षक श्री बच्चन सिंह यांचे निर्देश Instruction of washim District SP Bachchan Singh
फौजदार व त्यापेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्यांना विशेष अधिकार प्रदान
जिल्हा पोलीस अधिक्षक श्री बच्चन सिंह यांचे निर्देश
वाशिम, दि. 30 www.jantaparishad.com (जिमाका) : जिल्ह्यात 31 ऑगस्ट रोजी गणेश स्थापना होणार आहे. 9 सप्टेंबर ते 11 सप्टेंबरपर्यंत गणेश मुर्तीचे विसर्जन होणार आहे. या सण उत्सवाच्या काळात जिल्ह्यात शातंता व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी वाशिम जिल्हा पोलीस अधिक्षक बच्चन सिंह (washim District SP Shri Bachchan Singh) यांनी जिल्ह्यातील सर्व फौजदार व त्यापेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्यांना 31 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर 2022 पर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 अन्वये अधिकार प्रदान केले आहे.
रस्त्यावरील किंवा रस्त्याने जाणाऱ्या मिरवणूकीतील किंवा जमावातील लोकांनी कशा रितीने चालावे, त्यांनी वर्तणूक किंवा वागणूक कशी ठेवावी या विषयी निर्देश देणे. कोणत्याही प्रकारच्या मिरवणुका कोणत्या मार्गांनी व कोणत्या वेळात काढाव्यात किंवा काढू नये, असे मार्ग व अशा वेळा निश्चित करणे. सर्व मिरवणुकींच्या व जमावाच्या प्रसंगी व उपासनेच्या जागांच्या आसपास उपासनेच्या वेळी व कोणत्याही रस्त्यावरून किंवा सार्वजनिक जागा किंवा सार्वजनिक स्थळी गर्दी होत असेल अशा सर्व प्रसंगी अडथळा होवू न देणे. सर्व रस्त्यांवर व रस्त्यांमध्ये, घाटात किंवा घाटांवर, कपडे धुण्याच्या व उतरण्याच्या जागांच्या ठिकाणी व जागांमध्ये, जत्रा, देवळे आणि ईतर सार्वजनिक स्थळी सुव्यवस्था राखणे. कोणत्याही रस्त्यात किंवा रस्त्याजवळ किंवा सार्वजनिक जागेत किंवा जागेजवळ वाद्ये वाजविण्याचे किंवा गाणी गाण्याचे, ढोल-ताशे व ईतर वाद्ये वाजविण्याचे आणि शिंगे व इतर कर्कश वाद्ये वाजविण्याचे विनियमन करणे व त्यावर नियंत्रण ठेवणे. कोणत्याही सार्वजनिक जागेत किंवा जागेजवळ किंवा कोणत्याही सार्वजनिक करमणुकीच्या ठिकाणी ध्वनिक्षेपकांचा उपयोग करण्याचे विनियमन करणे व त्यावर नियंत्रण ठेवाव्यात.
सक्षम प्राधिकाऱ्यांने या अधिनियमाची कलमे 33, 35 व 37 ते 40, 42, 43 व 45 या अन्वये दिलेल्या कोणत्याही आदेशास अधीन असलेले व त्यास पुष्टी देणारे योग्य आदेश द्यावे. वरील आदेशाचे कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही प्रकारे उल्लंघन केल्यास महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 134 प्रमाणे तो शिक्षेस पात्र राहील. असे जिल्हा पोलीस अधिक्षक बच्चन सिंह यांनी कळविले आहे.
Post a Comment