मोफत कोरोना बुस्टर डोस ७१ नागरिकांनी घेतला लाभ Ashwin auto services Karanja booster dose camp
मोफत कोरोना बुस्टर डोस ७१ नागरिकांनी घेतला लाभ
कारंजा दि.१८ - स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव निमित्ताने ग्रामीण रुग्णालय कारंजा तर्फे सोमवार दि 15 ऑगस्ट, स्वातंत्र्य दिनाच्या पर्वावर नागरिकांसाठी मोफत बुस्टर डोस च्या शिबिराचे अश्विन ऑटो सर्विसेस बायपास आयोजन केले होते या शिबिरामध्ये एकूण 71 नागरिकांना बूस्टर डोस देण्यात आला
या शिबिराच्या उद्घाटनासाठी उपजिल्हा रुग्णालयातून दिपालीताई तायडे, वर्षाताई चव्हाण व श्री प्रकाशदादा राऊत, डॉ शिरीन फुलाडी,श्री उमेशजी माहीतकर सर, सौ दीप्ती मेहता, उपस्थित होते. यावेळी कोईशील्ड चे 50 डोस व कोव्याकसीन चे 21 डोस नागरिकांना देण्यात आले शिबीरा दरम्यान गो-ग्रीन चे सदस्य सचिन ताथोड, व प्रज्वल गुळलकरी यांनी भेट दिली. उपजिल्हा रुग्णालय टीम चे श्री चंद्रेशजी मेहता यांनी आभार मानले
Post a Comment