इन्नाणी महाविद्यालयात चतुर्थ पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ संपन्न.4th degree certificate distribution ceremony concluded in Innani college
इन्नाणी महाविद्यालयात चतुर्थ पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ संपन्न
कारंजा दिली.१८ - विद्याभारती शैक्षणिक मंडळाअंतर्गत स्वा. से. श्री. क. रा. इन्नाणी महाविद्यालय, कारंजा लाड येथे चतुर्थ पदवी प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम संपन्न झाला.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. एन. देवरे सर होते तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. शार्दुल डोंणगावकर, डॉ. अजय कांत व डॉ.पद्माकर मिसाळ उपस्थित होते.
या कार्यक्रमात विद्यार्थ्याना पदवी प्रमाणपत्र देताना उपप्राचार्य डॉ. आर. ए.पाटील सर, डॉ. के. जी. राजपूत, डॉ. टी. डी. राजगुरे व प्रा. व्ही. ए. महाले यांनी विद्यार्थ्याच्या नावाची घोषणा केली व मा. प्राचार्य तथा उपस्थित मान्यवरांनी पदवी प्रमाणपत्रे प्रदान केली. या प्रसंगी मा. प्राचार्य डॉ. ए. एन देवरे सरांनी विद्यार्थ्यांना शपथ देवून उपदेश केला व मान्यवरांसमोर उद्बोधन केले. सदर कार्यक्रमात पाहूण्यांचा परिचय आय क्यु. ए. सी. प्रमुख प्रा. एन. जी जाधव यांनी करून दिला. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. शार्दुल डोणगावकर यांनी मार्गदर्शन केले
सदर कार्यक्रमाचे सुत्र संचलन प्रा. ए. ए.नांदगावकर यांनी केले. या कार्यक्रमास मा. श्री. रावासाहेबजी शेखावत व मा. श्री. डॉ. ए. डी. चौहान यांच्या शुभेच्छा लाभल्या तसेच सदर कार्यक्रमास स्थानीय व्यवस्थापन समितीचे सन्मानीय सदस्य श्री.प्रकाशसेट गोलेच्छा, श्रीमती उर्मीलाताई ठाकुर, श्री मनोहर राऊत, श्री. देवानंद बोन्ते यांची उपस्थिती लाभली. या कार्यक्रमासाठी प्रा. व्ही. आर. ढेंगळे, डॉ. एस. के. थोरात, प्रा. संदीप कोकाटे, प्रा. कीरण सोमवंशी, प्रा. सौ. एस. डी. वंजाळकर, डॉ. एम. के. कावरे, प्रा. सीमा कोथळकर, प्रा. ललीत खरड, श्री.रवी मानकर कार्यालय अधिक्षक, श्री. विवेकजी देशमुख, श्री. बी. जी. प्रसाद, श्री. संजयजी निपाने, श्री.विनोद विसाळे, श्री. शुध्दोधन तायडे, श्री. नावेद शेख, श्री. राजरत्न राऊत, श्री. प्रवीण बासूळे या समवेत बी. ए. भाग १ च्या विद्यार्थ्याचे तथा समस्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या कार्यक्रमात एकंदर ९२ पदवी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले उर्वरीत विद्यार्थ्यांना आपले पदवी प्रमाणपत्र कार्यालयातून स्विकारण्याचे आवाहन करण्यात आले.
Post a Comment