Header Ads

अतिवृष्टीमुळे वाशिम जिल्ह्यात आज व उद्या दोन दिवस (वर्ग १ ते १२) शाळांना सुट्टी heavy rain schools will remain closed for two days

 



अतिवृष्टीमुळे  वाशिम जिल्ह्यात आज व उद्या दोन दिवस (वर्ग १ ते १२) शाळांना सुट्टी

कारंजा (www.jantaparishad.com) दि. १८ - सद्या महाराष्ट्रात सर्वदूर अतिवृष्टी होत आहे. अतिवृष्टीमुळे विद्यार्थ्यांचे शाळेत येण्याचे प्रमाण अतिशय नाममात्र आहे. तसेच ओढे, नद्या- नाले हे ओसंडून वाहत आहेत.

अतिवृष्टीमुळे विद्यार्थ्याच्या बाबतीत अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. जिल्हयातील सर्व शाळा ( वर्ग 1 ते 12 वी )
बंद ठेवाव्यात असे निवेदन संघटनानी दिले आहे.

त्याअनुषंगाने दि. 18.07.2022 व दि. 19/07/2022 या दोन दिवस  वाशिम जिल्ह्यातील सर्व शाळा (वर्ग 1 ते 12) बंद ठेवण्याबाबत मा.जिल्हाधिकारी, वाशिम यांनी निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार वरील प्रमाणे दोन दिवस वाशिम जिल्ह्यातील सर्व शाळा बंद ठेवाव्यात. व या दोन दिवसाचे अध्ययन अध्यापनाचे कार्य ऑनलाईन पध्दतीने घेण्यात यावे.

असे आदेश एका पत्रकानुसार शिक्षणाधिकारी माध्यमिक, व शिक्षणाधिकारी प्रार्थमिक  जिल्हा परिषद वाशिम यांनी दिले आहे.



No comments

Powered by Blogger.