Header Ads

शाकाहारामुळेच भारत देश सुरक्षित - आचार्य विद्यासागरजी महाराज Acharya Vidhyasagarji Maharaj in Shirpur Jain washim

Acharya Vidhyasagarji Maharaj in Shirpur Jain


शाकाहारामुळेच भारत देश सुरक्षित 

आचार्य विद्यासागरजी महाराज यांचे मार्गदर्शन 

Acharya Vidhyasagarji Maharaj 

वाशिम दि . १९ - देश विदेशात अनेकजण मासाहाराचे सेवन करीत आहेत. कोरोनाच्या दोन लाटामध्ये सर्वात जास्त विदेशात लोकांना जीव गमवावे लागले. भारत देशामध्ये मात्र कोरोनाचा जास्त प्रभाव दिसला नाही. याचे मुख्य कारण भारत देशात सर्वात जास्त श्ाुध्द शाकाहार हे आहे. विदेशामध्ये मोठया प्रमाणात मासाहाराचे सेवन केल्या जात असल्याने त्याचे दुष्परिणाम त्यांना भोगावे लागले. कोणत्याही जीवाची हत्या हे मोठे अपराध आहे. प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे. भारतीय संस्कृती व परंपरा ही जीवो व जिने दो ची असून भारत देश सर्व विश्वामध्ये सर्वश्रेष्ट असल्याचे प्रतिपादन संत शिरोमनी युगश्रेष्ठ आचार्य विद्यासागरजी महाराज (Acharya Vidhyasagarji Maharaj in Shirpur Jain)यांनी केले.

   शिरपूर जैन येथे चार्तुमास निमीत्त आयोजित प्रवचनात भक्तांना मार्गदर्शन करतांना त्यांनी वरील प्रतिपादन केले.  यावेळी मंचावर श्रवण मुनीश्री प्रसादसागरजी महाराज, मुनीश्री चंद्रप्रभसागरजी महाराज, मुनीश्री निरामयसागरजी महाराज व ऐलक श्री सिध्दांतसागरजी महाराज होते.  आचार्य विद्यासागरजी महाराज (Acharya Vidhyasagarji Maharaj) यांनी सांगितले की, घरामध्ये तयार झालेले अन्न शुध्द व पवित्र असते त्यामुळे आपले आरोग्य चांगले राहते, विदेशामध्ये खाओ और खाने दो ही संस्कृती असल्याने या राष्ट्रांना कोरोना काळात मोठे आव्हानाला समोरे जावे लागले. वाढत्या हिंसाचार व मासाहारामुळे कोरोना या महामारीने दोन वर्षपर्यंत संपूर्ण जगामध्ये थैमान घातले.  आपल्याला आवश्यक धान्य घरामध्ये ठेवून प्रत्येकाने शाकाहारचा प्रचार व प्रसार त्याचे महत्व जरूरी असल्याचे आचार्यश्री यांनी स्पष्ट केले. प्रवचनाला मोठया संख्येने भाविक भक्तगण उपस्थित होते.  

No comments

Powered by Blogger.