Header Ads

विद्यार्थीनीनी आधार दुरुस्तीसाठी नजीकच्या आधार केंद्रावर संपर्क साधण्याचे आवाहन - Girl students should get their adhar card corrected from adhar centers



विद्यार्थीनीनी आधार दुरुस्तीसाठी नजीकच्या आधार केंद्रावर संपर्क साधण्याचे आवाहन

          वाशिम, दि. 10 (जिमाका) : जिल्हयातील विद्यार्थीनीनी त्यांच्या शिष्यवृत्ती कामासाठी आधारकार्ड दूरुस्ती करण्याकरीता जवळच्या आधार केंद्रावर जाऊन आपल्या आधारकार्डमध्ये दुरुस्ती करुन घ्यावी. जिल्हयात सद्यस्थितीत शासनाच्यावतीने 41 आधार केंद्र सुरु आहे. ते तालुकानिहाय पुढील प्रमाणे. वाशिम तालुका-6, मालेगांव तालुका-7, रिसोड तालुका-12, कारंजा तालुका-7, मंगरुळपीर तालुका-5 व मानोरा तालुका-4 असे आधार केंद्र तालुक्यातील तहसिल कार्यालय, पंचायत समिती कार्यालय व मंडळ अधिकारी कार्यालय येथे सुरु आहे.

 तरी विद्यार्थीनींनी या आधार केंद्रावर जाऊन आपले आधारकार्ड दूरुस्त करावे. आधारकार्ड दूरुस्त करीत असतांना काही अडचणी आल्यास संबंधित कार्यालयाच्या अधिकाऱ्याशी तसेच जिल्हास्तरावर आधार समन्वयक सौरभ जैन (8275556415) आणि जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक जुनेद शेख (9326772447) यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.  

No comments

Powered by Blogger.