Header Ads

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमिवर होळी, धुलिवंदन व रंगपंचमी गर्दी न करता साजरा करा DM appeal for celebrating Holi, rangpanchami




कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमिवर होळी, धुलिवंदन व रंगपंचमी गर्दी न करता साजरा करा

जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष षण्मुगराजन एस. यांचे जनतेला आवाहन

           वाशिम, दि. 17 (जिमाका) : जिल्हयात 17 मार्चला होळी, 18 मार्चला धुलिवंदन आणि 22 मार्चला रंगपंचमी उत्सव साजरा करण्यात येणार आहे. राज्यात मोठया प्रमाणात कोविड-19 चा प्रसार होत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहे. कोराना संसर्गाच्या पार्श्वभूमिवर हे उत्सव गर्दी न करता साजरे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष षण्मुगराजन एस. यांनी दिले आहे. राज्यात साथ प्रतिबंधक अधिनियमाची अधिसुचना जारी करण्यात आली आहे. कोविड-19 मुळे गेल्या दोन वर्षापासून सर्वधर्मिय सण, उत्सव तसेच विविध कार्यक्रम नागरीकांनी मोठया प्रमाणात एकत्र न येता शक्यतोवर घरातच राहून साजरे केले आहे.

               कोरोनाचे संक्रमण अद्यापही सुरु असल्याने होळी, धुलिवंदन व रंगपंचमी उत्सव नागरीकांनी मोठया प्रमाणात एकत्र येऊन अथवा गर्दी करुन साजरे न करता स्वत:च्या व इतरांच्या आरोग्याच्या दृष्टीकोणातून काळजी घेऊन साजरी करणे आवश्यक आहे. यासाठी मार्गदर्शक सुचना निर्गमित केल्या आहे. जिल्हयात होळी, धुलिवंदन व रंगपंचमी हे उत्सव साजरे करतांना कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहे. 1 मार्च 2022 रोजी राज्य शासनाच्या परिपत्रकामध्ये दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. होळी/शिमगा हा सण संपूर्ण महाराष्ट्रात मोठया उत्साहात साजरा करण्यात येतो.

        17 मार्चला होळीचा सण आहे. कोविड संक्रमणामुळे हा सण शक्यतोवर गर्दी न करता कोविड अनुरुप वर्तन नियमांचे पालन करुन साजरा करावा. 18 मार्च रोजी धुलिवंदन आणि 22 मार्च रोजी रंगपंचमी हे सण साजरे करण्यात येणार आहे. या सणानिमित्त एकमेकांवर रंग टाकणे, पाणी टाकणे, एकमेकांना गुलाल लावून रंगांची उधळण करण्यात येत असते. परंतू कोविड-19 चा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी धुलिवंदन व रंगपंचमी हे उत्सव साधेपणाने साजरे करावे. होळी/ शिमगा निमित्ताने पालखीची मिरवणूक काढण्यात येते परंतू यावर्षी पालखी घरोघरी न नेता स्थानिक मंदिरातच दर्शनाची व्यवस्था करावी. याकरीता स्थानिक प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना कराव्यात. तसेच त्याठिकाणी गर्दी होणार नाही आणि कोविड अनुरुप वर्तणूक नियमांचे तंतोतंत पालन होईल याकडे सर्वतोपरी लक्ष देऊन योग्य ती दक्षता घेण्यात यावी.    

               कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित नगरपालिका, नगरपंचायत, पोलीस प्रशासन व स्थानिक प्रशासन यांनी विहीत केलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा समूह आपत्ती व्यवस्थापन अधिनियमान्वये आणि भारतीय दंड संहितेच्या कलम 188 अन्वये शिक्षेस पात्र असलेला अपराध केला आहे असे मानण्यात येऊन कारवाई करण्यात येईल. असे जिल्हाधिकारी यांच्या आदेशात नमूद केले आहे.    

No comments

Powered by Blogger.