Header Ads

जवाहर नवोदय विद्यालय इयत्ता नववीची 9 एप्रिलला निवड चाचणी परीक्षा jawahar navoday 9th class entrance exam



जवाहर नवोदय विद्यालय इयत्ता नववीची 9 एप्रिलला निवड चाचणी परीक्षा

           वाशिम, दि. 17 (जिमाका) : जवाहर नवोदय विद्यालय इयत्ता नववीची निवड चाचणी परीक्षा 9 एप्रिल रोजी सकाळी 11.15 वाजता ते दुपारी 1.45 दरम्यान होणार आहे. जिल्हयातील 382 विद्यार्थी हे परीक्षा देणार आहे. ही परीक्षा जवाहर नवोदय विद्यालय, वाशिम आणि श्री शिवाजी हायस्कुल, वाशिम या दोन परीक्षा केंद्रावर होणार आहे. या परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांचे उपस्थिती परीक्षा केंद्रावर सकाळी 10.30 वाजता आवश्यक आहे. या परीक्षेचे परीक्षा प्रवेशपत्र संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले आहे. जिल्हयातील संबंधित शाळेतील मुख्याध्यापक, पालक व विद्यार्थ्यांनी परीक्षेचे प्रवेशपत्र संकेतस्थळावरुन डाऊनलोड करुन घ्यावे. 9 एप्रिल रोजी सकाळी 10.30 वाजता परीक्षा केंद्रावर उपस्थित रहावे. असे आवाहन जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य सचिन खरात यांनी केले आहे.  

No comments

Powered by Blogger.