Header Ads

शिवजयंती दिनी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन - blood donation camp on occasion of Shi Jayanti



शिवजयंती दिनी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन

कारंजा दिली.१८ - हिंदवी स्वराज्याचे तथा संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून अखिल भारतीय मराठा महासंघ यांच्या वतीने ता. 19 फेब्रुवारी रोजी  शिवजन्मोत्सव सोहळा सकाळी 9 वाजता तद्नंतर 10 वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज नगर स्थित हनुमान मंदिर मराठा संस्थान येथे केले आहे. 

     गेल्या दोन वर्षांपासून कोरोना या वैश्विक महामारीमुळे संपूर्ण जग हादरले असल्याने शासनाने आखून दिलेल्या नियम व अटींच्या अनुषंगाने काही सार्वजनिक कार्यक्रमांवर गदा आली आहे. मात्र, कारंजा शहरातील काही सामाजिक संस्था कोरोना महामारीच्या नियमांचे काटेकोर पालन करून शिवजयंती सोहळा दिनी स्तुत्य उपक्रम राबविणार असल्याने त्याच एक अनुशेष म्हणून, 'रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान' या बिरुदावलीला खरे उतरुन रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

 सदरहू, आयोजित कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून, उपविभागीय अधिकारी राहुल जाधव, तहसीलदार धीरज मांजरे यांची उपस्थिती राहणार आहे. आयोजित कार्यक्रमाला जय बजरंग व्यायाम शाळा, कारंजा रक्तदान चळवळ यांचे सहकार्य लाभणार असून, सदरच्या कार्यक्रमात कोरोना महामारीच्या  नियमावलीचे काटेकोर पालन करून सहभागी व्हावे. असे, प्रसिद्धी पत्रकाद्वारे अखिल भारतीय मराठा महासंघाचे वाशीम जिल्हाध्यक्ष संजय काकडे यांनी कळविले आहे.

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.