Header Ads

राज्यातील महाविद्यालयं १५ फेब्रुवारी पर्यंत बंद राहणार colleges will be closed upto 15 Feb



राज्यातील महाविद्यालयं १५ फेब्रुवारी पर्यंत बंद राहणार

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची घोषणा

मुंबई दिल्ली.५ - कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विद्यापीठं आणि महाविद्यालयं १५ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी जाहीर केला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं महाविद्यालयं आणि विद्यापीठ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती उदय सामंत यांनी यावेळी दिली. नुकतंच मुंबईतील शाळा ३० जानेवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनानं जाहीर केला होता.

मुंबईत दिवसागणिक रुग्णसंख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. मुंबईत काल तब्बल १० हजाराहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईतील इयत्ता पहिली ते नववी आणि अकरावीचे वर्ग ३० जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय याआधीच घेण्यात आला होता. त्यानंतर महाविद्यालयं देखील बंद करण्याबाबतची घोषणा केली जाऊ शकते अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. अखेर आज उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन महाविद्यालयांबाबतचा निर्णय जाहीर केला आहे.

उदय सामंत काय म्हणाले?

राज्यातील अकृषी विद्यापीठे,अभिमत , स्वयं अर्थसहाय्यीटविद्यापीठे, तंत्रनिकेतन,शैक्षणिक संस्था 15 फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार

दरम्यानच्या काळात पूर्वीप्रमाणे ऑनलाईन शिक्षण सुरू राहणार

परीक्षा ही ऑनलाईन होणार

काही कारणास्त्व विद्यार्थी ऑनलाईन परीक्षांना उपस्थित न राहिल्यास शैक्षणिक हित लक्षात घेऊन त्यांना परीक्षेची संधी द्यावी

प्रत्येक महाविद्यालयांना आणि विद्यापीठाला हेल्पलाईन सुरू करण्याचे निर्देश

वसतिगृहातील विद्यार्थ्यांना पूर्वसूचना देऊन ते बंद करण्याचा निर्णय

परदेशी विद्यार्थ्यांना वसतिगृहात काळजी घेऊन राहता येणार

महाविद्यालयानी विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण करून घेण्याच्या ही सूचना

विद्यार्थ्यांसोबत शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी, प्राध्यापक यांच्या लसीकरण पूर्ण करून घेण्याचा सूचना देन्यात येतिल तसेच 50 टक्के उपस्थितीत प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून  ऑनलाईन अध्यापन सुरु राहणार*हे सगळे नियम खासगी विद्यापीठे, शिक्षणसंस्था, स्वायत्त महाविद्यालयांना लागू राहणार आहे

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.