पोस्ट कार्यालया मार्फत आधारकार्डला मोबाईल क्रमांक लिंक करण्याची सुविधा - link mobile number to aadhar in post office
पोस्ट कार्यालया मार्फत आधारकार्डला मोबाईल क्रमांक लिंक करण्याची सुविधा
Link Mobile Number to Aadhar in Post Office
वाशिम, दि. 22 (जिमाका) : जिल्हयातील सर्व पोस्ट कार्यालयामार्फत आधारकार्डला मोबाईल क्रमांक लिंक (link mobile number to aadhar in post office) करण्याची सुविधा सुरु करण्यात आली आहे. आधारकार्डला मोबाईल क्रमांक लिंक करण्याचे फायदे पुढील प्रमाणे आहे. पीएम किसान पोर्टलवर स्वत: ई-केवायसी करता येईल, पॅनकार्ड, वाहन परवाना, पासपोर्ट काढण्यासाठी, आयकर रिटर्न भरण्यासाठी, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अर्ज करण्यासाठी, केंद्र तसेच राज्य शासनाच्या विविध योजनांचे लाभ मिळविण्यासाठी, स्वत:च्या स्वत: आधारकार्डमध्ये किरकोळ बदल करण्यासाठी, आपल्या आधारचा इतरांकडून होणारा दुरुपयोग टाळण्यासाठी आणि बँक तसेच डी-मॅट खाती सुरु करण्यासाठी होणार आहे.
ही सुविधा जिल्हयातील सर्व पोस्ट कार्यालयामध्ये सुरु करण्यात आली आहे. या सुविधेचा जिल्हयातील सर्व नागरीकांनी लाभ घेण्यासाठी जवळच्या पोस्ट कार्यालयाशी संपर्क साधावा. असे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.
Post a Comment